ढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू
शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह काढला बाहेर
ज्ञानेश्वर बागडे
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
पिंपरी-चिंचवड येथील पाच तरुण काल ढाक भैरव गडावर ट्रेकिंग करायला गेले असताना रात्र झाल्याने ते गडावर मुक्कामी राहिले.आज सकाळी लवकर गडावरून परतीच्या प्रवासाला लागले असता, गडावरून खाली उतरत असताना गडावरील गुहेतून उतरत असताना हात सटकल्याने प्रचिकेत काळे या 34 वर्षीय युवक 200 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.त्याच्या मित्रांनी ही खबर शिवदुर्ग मित्र लोणावळा यांना दिली ,शिवदुर्ग मित्र लोणावळाचे दोन सदस्य रेकी करण्यासाठी आधीच गेले होते,ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.प्रचिकेत काळे हा खोल दरीत पडल्याने शिवदुर्ग मित्र लोणावळा यांची पूर्ण टीम घटनास्थळी दाखल होऊन प्रचिकेतला बाहेर काढून कर्जत येथे आणलं.सदरच्या घटनेची नोंद कर्जत पोलिसांत झाली असून कर्जतचे पोलीस निरीक्षक अरुण भोर हे अधिक तपास करत आहेत.
आज सकाळी 7.00 वाजता प्रचिकेत भगवान काळे वय 32 पिंपरी चिंचवड, हा ढाक भैरव. येथे गुहेतून खाली उतरताना हात सटकून अंदाजे 200 फुट दरीत पडला होता. हाताला , डोक्याला गंभीर दुखापत आहे, व श्वास चालू आहे, असे समजले.
शिवदुर्गचे अनिकेत बोकील, दिपक पवार हे कळकराय येथे क्लायबींगसाठी रेकी करत होते. लगेचच ते खाली गेले. नंतर कामशेतचे अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, शुभम आंद्रे, अविनाश केदारी झटपट त्यांच्या मदतीला पोचले. पायऱ्यामुळे त्यांच्यापर्यंत त्याचे मित्र व इतर ग्रुपचे सदस्य पोचले होते. पण काहिच क्षणात त्याचा श्वास थांबला असेल. बाकी टीम तयारी करुन ढाक दिशेने निघाली. कामशेत पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची कल्पना दिली. अनिकेत व दिपक ने हालचाल करुन बॉडी पॅक केली व वर खेचण्यासाठी सेट अप लावला. बॉडी खेचत होते तर लोणावळ्याहून अजून फौज आली .
अशा प्रकारच्या रेस्कुला मोठी टीम लागते. टेक्निकल टीम टेक्निकल काम करते ,पण पुढे उचलून गाडी पर्यंत आणने खुपच जिकीरीचे असते. आमचे सर्व सदस्य अष्टपैलू आहेत, जे दोन्ही बाजू संभाळून घेतात.
आज इतरही ट्रेकर्स ग्रुपनी खुप सहकार्य केले.
आजची टीम
अनिकेत बोकील, दिपक पवार, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, अविनाश केदारी, चंद्रकांत बोंबले,रसिक काळे, रोहीत वर्तक, ओंकार पडवळ, अशोक उंबरे, सतिष मेलगाडे, महेश मसने, गणेश गिद, विशाल मोरे, नेहा गिद, प्रियंका मोरे, नुतन पवार, ब्रिजेश ठाकुर ,अनिकेत आंबेकर, ओंकार म्हाळसकर, गोपाळ भंडारी, अशी माहिती शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सुनिल गायकवाड यांनी दिली.