कर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल
राजू थोरात- तासगांव
तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोलिस व्ही,व्ही,मदने कार्यरत होत्या. कामात कसुरता व विना परवानगी गैरहजर राहिल्यामुळे सांगलीचे पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम यांनी निलंबित करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महिला पोलिस कर्मचारी व्ही व्ही मदने यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.या बाबत तासगांव पोलीसांनी माहिती दिली की तासगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन तपासी महिला अंमलदार मपोना व्ही.व्ही. मदने यांनी त्यांचेकडील प्रलंबित तपासावर प्रकरणाची निर्गती करणेबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांचे सहीने त्यांना वारंवार लेखी तसेच तोंडी आदेश देवुनही त्यांनी विनाकारण भाग-5 गुन्हे व मयत प्रकरणे, मिसींग प्रकरणे ,दारुबंदी प्रकरणे विनाकारण तपासावर प्रलंबित ठेवुन सदर गुन्हयांची निर्गती केलेली नाही. तसेच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलेले नाहीत. त्यांना वेळोवेळी लेखी सुचना देवुनही त्यांनी कोणत्याही आदेशाचे पालन केलेले नाही. तसेच कोणत्याही नोटीसचे उत्तर दिलेले नाही. त्यांनी तपासी अंमलदार
म्हणुन फिर्यादीला न्याय देणेचे हेतुपुर्वक टाळुन मुलभुत तपास पुर्ण करुन आरोपीविरुध्द दोषारोपपन्न पाठविणे हे त्यांचे कर्तव्य असताना आरोपीस सहकार्य व्हावे या उददेशाने गुन्हे / प्रकरणे प्रलंबित ठेवलेने
त्यांनी शासकीय कर्तव्यात कसुरी केली आहे. तसेच कर्तव्यावर हजर झालेपासुन दिनांक 3/11/18 ते
12/11/18, व दिनांक 26/11/2018 ते 26/12/18 पर्यंत एकुण- 41 दिवस, तसेच दिनांक
28/1/19 पासुन सुमारे 52 दिवस, तसेच दिनांक 18/3/20 ते दिनांक 30/6/20 पर्यंत
एकुण-103 दिवस, तसेच दिनांक 12/9/20 पासुन ते बदलीचे दिनांक पर्यंत 2/12/20 रोजीपर्यंत
एकुण - 80 दिवस, असे एकुण- 276 दिवस विनापरवाना कर्तव्यावर गैरहजर राहुन पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी फोनद्वारे सदरचे प्रलंबित प्रकरणे जमा करणेबाबत कळविले असता तरीही त्यांनी वरील सर्व
गुन्हयांची कागदपत्रे पोलीस ठाणेत अगर न्यायालयात किंवा शासकीय कार्यालयात न ठेवता आपले कब्जात ठेवली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी सदर बाबत मा. पोलीस अधीक्षक सांगली यांचेकडे त्यांचा
कसुरी अहवाल पाठविलेला होता. व सदर बाबत मा. पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम सांगली यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी मपोना व्ही. व्ही.मदने यांचविरुध्द भादविस कलम- 175 188,217,218
सह महाराष्ट पब्लिक रेकॉर्ड अँक्ट 2005 चे कलम- 9 प्रमाणे तासगाव पोलीस ठाणेस फिर्याद दिले प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार हे करीत आहेत. महिला पोलीस यांना निलंबित केल्यामुळे तासगांव पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे