कर्जत कल्याण रस्त्यामधील डिकसळ येथे रस्त्यावर दुकानदारांनी केले अतिक्रमण. - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, July 30, 2020

कर्जत कल्याण रस्त्यामधील डिकसळ येथे रस्त्यावर दुकानदारांनी केले अतिक्रमण.

कर्जत कल्याण रस्त्यामधील डिकसळ येथे रस्त्यावर दुकानदारांनी केले अतिक्रमण.


नरेश कोळंबे -
कर्जत
      कर्जत कल्याण या महामार्गा चे रुंदीकरणाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. चिंचोळे रस्ते तोडून वाहन क्षमता वाढविण्यासाठी रुंदीकरणाचे कार्य शासनाने हाती घेतले आहे,   त्यामुळे या रस्त्यांच्या कामांना वेग आलेला आहे. परंतु असे असताना या रस्त्याला लागूनच अनेक दुकानदार आपले दुकान थाटून बसले आहेत. व त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना पुन्हा जैसे थे चा अनुभव येत आहे. डिकसळ या छोट्या बाजारपेठ मध्ये सुद्धा अश्या काही दुकानदार लोकांनी जागा आडवत दुकाने थाटली आहेत व त्यामुळे डिकसळ बाजारपेठेत पुन्हा रस्ते चिंचोळे होण्याच्या मार्गावर आहेत.

       कर्जत  कल्याण रोडला लागुन डिकसळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या बाजारपेठेचे "कोषाणे धबधबा" हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी आशाणे कोषाणे धबधब्यावर जाण्यासाठी येतात. व या येणाऱ्या पर्यटकांकडून चांगली कमाई होत असल्याने या बाजापेठेत दोन्ही  बाजुने दुकाने मांडून दुकानदार बसले  आहेत. दुकानदारांनी आपली ही दुकाने फुटपाथ वर मांडली आहेत. तसेच हातगाडी वाले देखील  अर्धा रस्ता वापरत आहेत . त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले आहे.  या अगोदर   डिकसळ नाक्यावर याच ठिकाणी मोठा अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये  एका कार चालकाने   दुकाना चा शेड तोडुन रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिका ला धक्का दिला होता व त्यामुळे त्या इसमाच्या पायाला जबर जखम झाली होती .

       कर्जत पासून नेरळ पर्यंत दोन्ही बाजूला ग्रामस्थ व शेजारील गाववाले यांनी नाश्ता , फुटाणे, मका, भुईमूग, शेंगा, मटण मच्छी आदी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद होत चालले आहेत व अश्या परिस्थितीत एखाद्या वाहनाने धडक दिल्यास दोषी कोण ? वाहन चालक की दुकानदार ? असा सवाल रायगड भूषण किशोर गायकवाड यांनी व्यक्त केला. फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली असताना तिला केराची टोपली शासनाने दाखवली ,अशी खंत किशोर गायकवाड यांनी व्यक्त केली. त्यामुळे भविष्यात जर कधी अपघात झाला तर त्यास  जबाबदार हे सर्व प्रशासकीय अधिकारी राहतील, असे मत किशोर गायकवाड यांनी बोलताना मांडले.

No comments:

Post a Comment