निवड नियुक्ती - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, July 23, 2020

निवड नियुक्तीश्री मणि जित सिंग यांनी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला.
 महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
 श्री मणि जित सिंग यांनी २२.७.२०२० पासून मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे.  १९८७ च्या भारतीय रेल्वे वाहतूक सेवेच्या (IRTS) तुकडीचा अधिकारी   म्हणून त्यानी पश्चिम रेल्वे, उत्तर रेल्वे आणि मध्य रेल्वेत मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक, मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक (प्रवासी सेवा)  आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी यासह विविध क्षमतांमध्ये काम करताना  रेल्वेच्या विविध बाबींचा त्यांना विस्तृत अनुभव आहे.   श्री बी. के. दादाभोय यांच्या पश्चात त्यांनी मध्य रेल्वेच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

 त्यांनी परदेशात  व्यापक प्रवास केला आहे आणि इन्सेड सिंगापूर येथे प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमासह विविध परिसंवाद आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे.  त्यांना खेळात रस आहे आणि ते पाच वर्षे पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनचे मानद सचिव होते. याच काळात पश्चिम रेल्वेने रेल्वे क्रीडा स्पर्धेत ओवरऑल चॅम्पियन ठरली.

No comments:

Post a Comment