Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

चांधई भिवपुरी रस्ता खड्यात ; कंत्राटदाराने काम अर्ध्यावर सोडले

चांधई भिवपुरी रस्ता खड्यात ; कंत्राटदाराने काम अर्ध्यावर सोडले
 
नरेश कोळंबे -
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
  
    कर्जत तालुक्यातील चांधई भिवपुरी ह्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर ह्या रस्त्याच्या कामासाठी  8 कोटी 42 लाख एवढी मोठी रक्कम मंजूर करण्यात आली  परंतु सदर रस्त्याचे काम काही दिवस केल्यानंतर ते अर्धवट सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे अर्धवट बनलेल्या रस्त्याचे खड्ड्यात रूपांतर झाले आहे  .
      कर्जत मधील भिवपुरी हे स्थानक परिसरातील सर्व शिक्षण घेणारे विद्यार्थी,  मजूर , कामगार वर्ग तसेच दुध विक्री करण्यासाठी बाहेर जाणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचे स्थानक आहे. म्हणूनच चांधई जवळील सर्व गावांसाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा व कमी खर्चिक असा असल्याने सर्व जण ह्याच रस्त्याचा वापर करतात. परंतु रस्ता अतिशय खराब झाल्याने ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी केल्या नंतर ह्या रस्त्यासाठी व अंतर्गत पुलासाठी 8 कोटी 42 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. सदर रस्ता मंजूर होऊन 2 वर्ष होऊन गेले तरीही ह्या रस्त्याचे कामकाज काही पूर्ण झाले नाही. कंत्राटदाराने काही दिवस काम केल्यानंतर जुन्या रस्त्याला मोठ्या खडीने भराव टाकण्यात आला होता .परंतु काही भागा त काम चालू असतानाच कंत्रादारांकडून ते काम पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जिथे खडीकाम झाले आहे अश्या ठिकाणी खडी रस्त्यावर आली आहे व काम न झाल्याने रस्त्याची झीज होऊन रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये चांधई व चिंचवली गावामध्ये  खड्डे झाल्याने खड्ड्यातील खराब पाणी घरात उडत आहे. रस्त्या अंतर्गत उक्रुळ तलाव व   चांधई कमान या ठिकाणी मोठे खड्डे झालेले आहेत .चांधई नदीवरील पुलावर देखील मातीची झीज झालेली असल्याने मोठे खड्डे   या ठिकाणी पडले आहेत व यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मंजूर झालेला निधी गेला कुठे? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies