Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रायगड जिल्ह्यात 14 हजार 017 जणांनी केली करोनावर मात


रायगड जिल्ह्यात 14 हजार 017 जणांनी केली करोनावर मात
 

महाराष्ट्र मिरर टीम अलिबाग

स्वतःच्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 14 हजार 017 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 430 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1467, पनवेल ग्रामीण-352, उरण-125, खालापूर-238, कर्जत-86, पेण-271, अलिबाग-204, मुरुड-44, माणगाव-71, तळा-8, रोहा-226, सुधागड-27, श्रीवर्धन-16, म्हसळा-19, महाड-118, पोलादपूर-9 अशी एकूण 3 हजार 281 झाली आहे.

      कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-6 हजार 073, पनवेल ग्रामीण-1 हजार 946, उरण-799, खालापूर-903, कर्जत-477, पेण-1130, अलिबाग-954, मुरुड-110, माणगाव-315, तळा-21, रोहा-491, सुधागड-33, श्रीवर्धन-132, म्हसळा-179, महाड-383,  पोलादपूर-71 अशी एकूण 14 हजार 017 आहे.            

        आज दिवसभरातही पनवेल मनपा-102, पनवेल ग्रामीण-51, उरण-13, खालापूर-36, कर्जत-6, पेण-39, अलिबाग-30, मुरुड-3, माणगाव-11, रोहा-7, सुधागड-1, श्रीवर्धन-4, म्हसळा-1,  महाड-14, पोलादपूर-8 असे  एकूण 326 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

      आतापर्यंत पनवेल मनपा-177, पनवेल ग्रामीण-49, उरण-35, खालापूर-39, कर्जत-19, पेण-38, अलिबाग-33, मुरुड-12, माणगाव-3, तळा-2, रोहा-17, सुधागाड-2, श्रीवर्धन-8, म्हसळा-7, महाड-28, पोलादपूर-9 असे एकूण 478 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

         आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-186, पनवेल (ग्रा)-31, उरण-7, खालापूर-29, कर्जत-9, पेण-48, अलिबाग-21, मुरुड-11, माणगाव-14, रोहा-42, सुधागड-14, श्रीवर्धन-4, म्हसळा-2, महाड-12  अशा प्रकारे एकूण 430 ने वाढ झाली आहे.

      आजच्या दिवसात 7 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-1, उरण-1, पेण-1, श्रीवर्धन-1, महाड-2, पोलादपूर-1)  मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.

      आतापर्यंत जिल्ह्यातून 58 हजार 759 नागरिकांचे SWAB  तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 178 आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies