माथेरान नगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष लखन यांची अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, August 22, 2020

माथेरान नगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष लखन यांची अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

 माथेरान नगरपालिकेचे माजी नगरसेवक  संतोष लखन यांची अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती 

 

चंद्रकांत सुतार--माथेरान


माथेरान नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री संतोष लखन यांची अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्षपदी  नियुक्ती झाली.

गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय सफाई मजदुर काॅग्रेस माथेरान अध्यक्षपदावर काम करताना सफाई कामगारांचा न्याय हिताच्या अनेक मागण्यासाठी सततचा पाठपुरावा  करत. सफाई कामगाराना त्याचा न्याय करून दिला आहे .सफाई कामगारांच्या अनेक  प्रश्नांबाबत न्याय मिळाला नाही तेव्हा उपोषणाचे हत्यार बाहेर काढत  अनेक मागण्या मान्य करुन घेतल्या होत्या. याची दखल घेत अखिल भारतीय सफाई मजदूर  काँग्रेस  रायगड यांनी  संतोष लखन या  लढवय्या कामगार नेत्याची  अखिल भारतीय सफाई मजदुर काॅग्रेसच्या रायगड अध्यक्षपदी निवड  करून  माथेरान  सफाई कामगार वर्गाला खऱ्या अर्थाने  योग्य अध्यक्ष  दिल्याने सफाई कामगार वर्गात आनंदी वातावरण आहे , संतोष लखन यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment