राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान पदाचा कार्यभार प्रवीण जैन यांच्याकडे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, August 27, 2020

राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान पदाचा कार्यभार प्रवीण जैन यांच्याकडे

 राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान पदाचा कार्यभार प्रवीण जैन यांच्याकडे

प्रवीण जैन मूळचे रायगड जिल्ह्यातील

अमूलकुमार जैन-

महाराष्ट्र मिरर टीम मुरुडराष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर.विमला(भा. प्र. से)यांच्या बदली झाली असल्याकारणाने त्यांच्याकडील पदभार ग्राम विभागाचे उपसचिव प्रवीण देवीचंद जैन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानच्या,नवी मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर.विमला(भा. प्र. से)यांना बदलीच्या पदावर रुजू होण्यासाठी 26 ऑगस्ट2020 रोजी कार्यमुक्त करण्यात आले आहे.

राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानच्या, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर.विमला(भा. प्र. से)यांनी त्यांच्याकडील पदाचा कार्यभार ग्राम विभागाचे उपसचिव प्रवीण देवीचंद जैन यांच्याकडे यांच्याकडे सोपविण्यात यावे असे शासन आदेश शासनाचे उपसचिव एकनाथ गागरे यांनी दिले आहे.

प्रवीण जैन हे रायगड जिल्ह्यातील बोर्ली येथील रहिवासी आहेत.असून त्यांचे प्राथमिक शिक्षण बोर्ली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत,साने गुरुजी विद्यालय, बोर्ली, महाविद्यालय शिक्षण मुरूड येथील सर.ए. एस हायस्कूल मध्ये तर उच्च महाविद्यालयीन शिक्षण अलिबाग येथील जे.एस.एम.महाविद्यालयात पूर्ण केले आहे.

No comments:

Post a Comment