सातारा ,कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्यांची आढावा बैठक संपन्न - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 9, 2020

सातारा ,कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्यांची आढावा बैठक संपन्न

सातारा ,कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्यांची आढावा बैठक संपन्न

कुलदीप मोहिते-कराड 


 यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन(टाऊन हॉल) कराड येथे सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना (कोविड १९) च्या सद्य परिस्थितीचा आढावा व संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना या संबंधीची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.नामदार राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली व  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.


यावेळी दोन्ही जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.


सदर बैठकीस विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, ग्रामविकासमंत्री मा.नामदार हसन मुश्रीफ, सहकार व पणन मंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील,  गृहराज्यमंत्री मा.नामदार शंभूराज देसाई, कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री मा.नामदार राजेंद्र पाटील येड्रावकर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार प्रकाश आव्हाडे,आमदार राजू आवळे, आमदार चंद्रकांत जाधव, अमर के.पी.पाटील कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजगेकर, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील,  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.सुनिल माने जिल्हाधिकारी सातारा शेखर सिंह, जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री.देसाई, पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुहास वारके, पोलीस अधीक्षक सातारा तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक कोल्हापूर डॉ.अभिनव देशमुख तसेच दोन्ही जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment