अतिवृष्टीची पूर्व सूचना - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, August 3, 2020

अतिवृष्टीची पूर्व सूचना

अतिवृष्टीची पूर्व सूचनाप्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्व सूचनांनुसार दिनांक 4 ते 6 ऑगस्ट, 2020 या कालावधीत  रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून  सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत, इलेक्ट्रिक पोल्स, स्विच बोर्ड,  इलेक्ट्रिक वायर्स  यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment