आदिती लक्ष्मण शेलार हिने दहावीत मिळविले उत्तम गुण, निकाल १००टक्के ठेवण्याची युनायटेड'ची यशाची परंपरा कायम - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, August 1, 2020

आदिती लक्ष्मण शेलार हिने दहावीत मिळविले उत्तम गुण, निकाल १००टक्के ठेवण्याची युनायटेड'ची यशाची परंपरा कायम

आदिती लक्ष्मण शेलार हिने दहावीत मिळविले उत्तम गुण,

निकाल १००टक्के ठेवण्याची युनायटेड'ची यशाची परंपरा कायम


 ओंकार रेळेकर -चिपळूण 

येथील युनायटेड इंग्लिश
स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयाकडून सर्व २८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाची विद्यार्थिनी आदिती  शेलार हिने ९५ टक्के गुण संपादित करून घवघवीत यश मिळविले आहे. आदितीला कथक नृत्याची आवड असून पुढे इंजिनिअरिंग
क्षेत्रात करिअर करण्याचा तिचा मानस आहे. नियोजनबद्धपणे
केलेला अभ्यास, संबंधित शिक्षकांच्या सूचनांची अंमलबजावणी व
आई-वडिलांचे उत्साही पाठबळ यामुळेच चांगली कामगिरी करता
आली असे तिने यावेळी बोलताना सांगितले. चिपळूणच्या युनायटेड
इंग्लिश स्कूलने चांगल्या निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली
आहे.

No comments:

Post a Comment