Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

प्रहारच्या दणक्याने केन ऍग्रोने शेतकऱ्याना दिले चेक

 प्रहारच्या दणक्याने केन ऍग्रोने शेतकऱ्याना दिले चेक

 सुधीर पाटील-सांगली


केन ऍग्रो एनर्जी( इंडिया) ली. रायगाव ता.कडेगाव, जि. सांगली या  साखर कारखान्याने भवानी नगर विटा येथील शेतकऱ्यांचे सन२०१८-१९ चे थकीत उसबिल देत नव्हते. त्या बाबत आज  आंदोलनाची सुरवात  कडेगाव तहसीलदार कार्यालया समोर प्रहार जनशक्ती पक्षा चे जिल्हा अध्यक्ष सुनिल सुतार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

    शेतकऱ्यांच्या थकीत बिलाबात प्रशासनाने लक्ष घालून शेतकऱ्यांना बिल मिळवून देण्याची  कारवाई करावी असे निवेदन 15 दिवसापूर्वी देण्यात आले होते. परंतु त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे  दि 21 पासून तहसीलदार कार्यालय कडेगाव समोर, शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

    साखर आयुक्त यांनी  थकीत रक्कमे पोटी कारखान्याच्या लिलावाचे आदेश दिले आहेत. परंतु उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना कोणतेही स्थगिती आदेश नसताना देखील त्यांनी लिलाव  प्रक्रिया प्रलंबित ठेवलेली आहे.  प्रक्रिया प्रलंबित ठेवून कारखाना प्रशासनाला ढील देऊन शेतकर्यांच्यावर अन्याययच केला जात आहे. प्रशासनाने दिलेल्या गाळप परवान्यांच्या आधारे कारखाने चालवले गेले आहेत. व त्यामुळेच शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस दिला आहे. परंतु आज प्रशासनास कोणत्याही कोर्टाचे लिलाव स्थगिती आदेश नसताना देखील प्रशासन लिलाव प्रक्रिया स्थगित ठेवलेली आहे. सदर बाब ही बेकायदेशीर आहे त्यामुळे या विरुद्ध  प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे आज आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सदर बिले वसूल करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे ही आमची कायदेशीर मागणी आम्ही तहसीलदार यांच्या पुढे लावून धरलेली होती. तरी याबाबत कडेगाव मतदार संघाचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी कृषी व सहकार मंत्री या नात्याने किमान त्यांच्या मतदार संघातील कारखान्याकडून होणारा तरी अन्याय दूर करावा अशी मागणी आंदोलकांनी केली होती.

     अखेर तालुका प्रशासनास व  कारखाना  प्रशासन शेतकऱ्याच्या प्रहरा पुढे नमले. व त्यांनी आंदोलन स्थळी येऊन  सर्व थकित शेतकऱ्यांचे देणे असलेल्या रक्कमेचा  चेक  तहसीलदार  शैलजा पाटील यांच्या समक्ष शेतक्यांना दिले  यावेळी सर्जेराव शिंदे , रायाजी शिंदे, बाळा शिंदे, रुपेश शिंदे, सुदाम शिंदे, चंद्रशेखर शिंदे, महादेव शिंदे, अर्जुन होगले, व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies