डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी सातारा सिविलचा पदभार स्वीकारलाः डॉक्टर अमोल गडीकर सक्तीच्या रजेवर - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, August 13, 2020

डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी सातारा सिविलचा पदभार स्वीकारलाः डॉक्टर अमोल गडीकर सक्तीच्या रजेवर


डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी सातारा सिविलचा पदभार स्वीकारलाः डॉक्टर अमोल गडीकर सक्तीच्या रजेवर

मिलिंद लोहार -सातारा


गेल्या काही दिवसापासून सातारा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये असे काही बरेच घडत होते कीजे मीडिया पर्यंत पोहोचत होते लोकांना कळत होते मात्र सिव्हिल हॉस्पिटल ची यंत्रणा एवढी कशी ढासळली याला जबाबदार कोण असे बरेच प्रश्न पडत होते मात्र मधल्या काळात कोरोना पेशंट चे होणारे हाल शौचालयात सापडलेल्या मृत भ्रूण  प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यावरून शल्यचिकित्सक  डॉक्टर अमोल गडीकर यांचे महाराष्ट्र मिरर लक्तरे काढले होते व याचा परिणाम म्हणून शरद पवार व आरोग्य मंत्री टोपे यांचा कराड दौरा  टोपे यांनी स्टेजवरच डॉक्टर अमोल गडीकर यांची तडकाफडकी बदली केली असल्याचे सांगितले मात्र तसे नसून ते सक्तीच्या रजेवर गेले असल्याचे समजते त्यानंतर त्यांचा कार्यभार सांभाळण्यासाठी डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या खांद्यावर सातारा सिविल चा कारभार देण्यात आला आहे मात्र डॉक्टर सुभाष चव्हाण हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाली तालुका कराड चे सुपुत्र व सध्या रत्नागिरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक होते बुधवारी सायंकाळी त्यांनी पदभार स्वीकारला सातारा जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना डॉक्टर सुभाष चव्हाण कशाप्रकारे सर्व परिस्थिती हाताळतात हे बघावे लागेल तसेच सिव्हिल हॉस्पिटल मधील कार्यरत टोळके यांना कशाप्रकारे आळा घालतात व कोणकोणत्या विभागातील लोकांवर कारवाई करतात याकडे संपूर्ण सातारा जिल्हा वाशीयांचे लक्ष लागले आहे

No comments:

Post a Comment