रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण तूर्तास स्थगित - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण तूर्तास स्थगित

 रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण तूर्तास स्थगित 

ज्ञानेश्वर बागडे-कर्जत


कर्जत तालुक्यातील रिलायन्स प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी तहसिल कार्यालय कर्जत येथे सकाळ पासून साय ६ पर्यंत साखळी पद्धतीने उपोषणाला बसले होते..तसेच जो पर्यंत शेतकऱ्यांना रिलायन्स आणि प्रशासन यांच्याकडून न्याय मिळत नाही तो पर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धार शेतकऱ्यांनी केला..या उपोषणाची दखल विधान परिषद विरोधी पक्ष नेते श्री प्रवीण दरेकर यांनी फोनद्वारे शेतकऱ्यांशी संपर्क साधून महसूल व रिलायन्स यांच्या सोबत शेतकऱ्यांची बैठक आयोजित करून हा विषय नक्की मार्गी लाऊ असे आश्वासन दिले. यावेळी कर्जत भाजपा यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत उपोषण स्थळी शेतकऱ्यांसोबत उपस्थित होते.


 तसेच तहसीलदार विक्रम देशमुख यांनी लेखी पत्र देत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सक्षम अधिकारी व रिलायन्स यांच्या सोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.


म्हणून आम्ही सर्व शेतकरी गणेशोत्सव आणि कोरोणा प्रादुर्भाव पाहता तहसीलदार  यांनी उपोषण स्तागित करण्यासाठी केलेली विनंती सर्व शेतकऱ्यांनी मान्य करत उपोषण मागे घेतले आहे.


याप्रसंगी आमदार तथा रायगड जिल्हाध्यक्ष  प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व राजेश भगत यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण झाले. याप्रसंगी कर्जत भाजपा पदाधिकारी सुनिल गोगटे, दीपक बेहेरे, मंगेश म्हसकर, रमेश मुंढे, वसंत भोईर, संतोष भोईर, अंकुश मुने, किरण ठाकूर, परशुराम म्हसे यांनी शेतकऱ्यांची  उपोषण स्थळी भेट घेत संपूर्ण पाठिंबा दर्शविला व शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment