Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

गुरुदेव ! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख

गुरुदेव !


भारतीय तत्वज्ञान व त्यातील वेद, उपनिषदे,  ऋचा, श्लोक यांचा अभ्यास करून त्यावर विवेचन करणाऱ्या महानुभावांपैकी एक म्हणजे गुरुदेव रानडे!

असे उपनिषदाचे गाढे अभ्यासक व निरुपणकार आणि भारतीय तत्वज्ञानातील अद्वैतवादाचे भाष्यकार  गुरुदेव रानडे यांचा आज जन्मदिन. आधुनिक युगात धर्माच्या पलिकडे जाऊन भारतीय उपनिषदांकडे पाहणारा असा अभ्यासक विरळाच.

ब्रह्मांड विज्ञान, मनोविज्ञान व धर्मशास्त्र या तिन्ही शास्त्रांचा अभ्यास करून जीवनात 'अंतीम सत्य' प्राप्त करण्यासाठी त्यांचा कसा आधार घेता येईल, याचे सूत्र गुरुदेव रानडेंनी प्रवचने, लेख व ग्रंथांतून सविस्तर विशद केले.

गुरुदेव अर्थात रामचंद्र दत्तात्रय रानडे यांचा जन्म १८८६ मध्ये आजच्या दिवशी कर्नाटकात विजापूर जिल्ह्यातील जमखिंडी गावात झाला. मुळातच बुद्धिमान असलेल्या रानडेंनी उच्च शिक्षण पुण्यातच पूर्ण केले व तिथेच महाविद्यालयीन अध्यापनाला सुरुवात केली.

पण उपनिषदांवरील त्यांच्या सखोल अभ्यासाची कीर्ती दिगंत पसरली. त्यामुळेच त्यांना अलाहाबाद विद्यापीठाने बोलावून तत्वज्ञान विभागाचे प्रमुख केले. नंतर ते याच विद्यापीठाचे कुलगुरूही झाले.

निवृत्तीनंतर रानडे कर्नाटकात निंबाळला स्थायिक झाले व त्यांनी तेथे आश्रम स्थापन करून शेकडो विद्यार्थ्यांना उपनिषदाचे शिक्षण दिले.  तिथेच त्यांना त्यांच्या विद्यार्थांनी 'गुरुदेव' ही उपाधी दिली.

त्यांनी 'A Constructive Survey of Upanishadic Philosophy' हा ग्रंथ लिहून भारतीय तत्वज्ञान व उपनिषदे यांची माहिती जगाला पोहोचवली. ज्येष्ठ तत्वज्ञ डाॅ. एस. राधाकृष्णन् डाॅ. रानडेंना आपले 'गुरुदेव' मानत.

ज्ञानदानाचे कार्य करत असतानाच या ज्ञानयोगी गुरुदेवांना ६ जून १९५७ रोजी देवाज्ञा झाली.

गुरुदेव रानडेंच्या स्मृतींना आदरांजली!

डॉ.भारतकुमार राऊत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies