युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी कर्जतचे वकील हृषीकेश जोशी यांची निवड जाहीर - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी कर्जतचे वकील हृषीकेश जोशी यांची निवड जाहीर

 युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी कर्जतचे वकील हृषीकेश जोशी यांची निवड जाहीर

ज्ञानेश्वर बागडे-कर्जत


कर्जत येथील भाजपचे कार्यकर्ते हृषीकेश जोशी यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे. भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी ही निवड जाहीर केली आहे. जोशींच्या या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

 

जोशी यांनी या आधी विद्यार्थी चळवळीत काम केले असून मनसे च्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीत त्यांनी अनेकदा सक्रिय सहभाग नोंदवला आहे. विविध प्रकारच्या सामाजिक आंदोलनात काम करण्याचा त्यांचा हातखंडा सर्वश्रुत आहे. विविध विषयाचा कायदेशीर अभ्यास करून जोशी यांनी कोणतेही राजकीय पद नसताना प्रशासनावर आपला दबदबा निर्माण केलेला असल्याने ते कायम चर्चेत असतात. भारतीय जनता पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या गुणवत्तेला न्याय मिळतो अशी प्रतिक्रिया जोशी यांनी दिली आहे. पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांचे व युवकांचे प्रश्न सोडवण्यास आपण प्रामाणिक प्रयत्न करू असे त्यांनी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment