Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कर्जतमध्ये सुरू होणार पोषण पुर्नवसन केन्द्र

 कर्जतमध्ये सुरू होणार पोषण पुर्नवसन केन्द्र!!


 कुपोषित मुलांना दिलासा ,दिशा केन्द्रच्या कँन प्रकल्पाच्या पाठपुराव्याला यश..

ज्ञानेश्वर बागडे-कर्जत


रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सर्वात जास्त कुपोषित मुले दर महिन्याला आढळून येतात या मुलांच्या आरोग्याची पोषणाची सोय असलेले एनआरसी -पोषण पुर्नवसन केन्द्र हे अलिबागला आहे .कर्जत खालापुर तालुक्यातील कुपोषित मुले व पालक अलिबागला जाण्यास तयार होत नव्हते ,अशा मुलांसाठी  कर्जत तालुक्यात स्वतंत्र पोषण पुर्नवसन केन्र्द - एनआरसी सुरू करावे अशी मागणी दिशा केंद्राच्या  वतीने चालवण्यात येणाऱ्या कँन प्रकल्पाच्या वतीने आक्टोबर 2018 पासून सात्यत्याने करण्यात येत होती ,अखेर या मागणीला यश आले असून रायगडच्या जिल्हाधिकारी  निधी चौधरी ,जि प चे मुख्यकार्यकारी आधिकारी डॉ.किरण पाटील यांनी  कर्जतमध्ये एनआरसी सुरू करणे बाबतचा प्रस्ताव राज्यकुटुंब कल्याण विभागाला सादर केला आहे .


  दिशा केन्र्दने कँन प्रकल्पा मार्फत स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय देखरेख नियोजन समिती समोर 2018,2019 मध्ये दर तीन महिन्यांनी होणाऱ्या आढावा बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता .राज्यस्थरावर कुपोषण प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखालील गाभा समिती समोर हा प्रश्न तत्कालीन जिल्हाधिकारी डाँ विजय सूर्यवंशी ,मुख्यकार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यांनी मांडला होता. ,गाभा समितीने तांत्रिक मंजूरी दिल्यानंतर नुकताच हा प्रस्ताव रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी व मुख्यकार्यकारी आधिकारी डाँ किरण पाटिल यानी कुटुंब कल्याण आयुक्तालयाला सादर केला आहे .


      एक आहार तज्ञ ,एक बालरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी असलेल्या पोषण पूर्नवसन केन्द्रात सहा वर्षापर्यतचे कुपोषित मुलांना दाखल करून सात दिवस या मुलांवर उपचार केले जाणार आहेत तसेच पोषक व शरीराची वाढ होणेसाठी गरजेचे असणारे विटँमीन,न्यूट्रिशन युक्त पोषण मुल्य असणारे आहार दिले जाणार आहेत या पोषण पूर्नवसन केन्द्रात दाखल मुलांच्या पालकांना बुडीत मजूरी देण्याची तरतूद असणार आहे .

                                            (सर्व छायाचित्रे-सोहेल शेख)

कर्जतमध्ये सुरू होणाऱ्या  पोषण पुर्नवसन केंद्राचा फायदा कर्जत तालुक्यासह खालापूर ,पनवेल ,पेण तालुक्यातील कुपोषित मुलांना होणार आहे .
कर्जत मध्ये आढळणारे तीव्र कुपोषित श्रेणीतील व वाढीतील घसरण असणारे कुपोषित मुले व पालक हे उपचारासाठी अलिबागला जाण्यास तयार होत नसत कारण अलिबागचे अतंर जास्त होते व त्या ठिकाणी मुलांची सोय होईल की नाही ही पण काळजी असायची ,कर्जत मध्ये एनआरसी सुरू झाली तर तालुक्यातील कुपोषण कमी होण्यास निश्चितच मदत होईल .


विमल देशमुख ,रवी भोई 

कँन प्रकल्प ,दिशा केन्द्र कर्जत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies