आरोग्य कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार? ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 12, 2020

आरोग्य कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार? ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष


आरोग्य  कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार? ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

ज्ञानेश्वर काकडे-भोकरदन


भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील आरोग्य कर्मचारी यांच्या संपूर्ण तपासण्या होत नसल्याने गावांमध्ये डेंगू सारख्या भयावह आजारांचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे. कारण काल दिनांक 11 रोजी गावामध्ये डेंगूचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आहे. याही अगोदर गावामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यातच आरोग्य अधिकारी/ कर्मचारी गावामध्ये गल्लो गल्ली फिरून कुठल्याही व्यक्तींचे प्रत्यक्षात रक्त नमुने घेत नाही व कुणासही आपल्या छोट्या-मोठ्या आजाराचे विचारणा करत नाही. त्यामुळे गावामध्ये इतर काही आजारांची पसरण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र गावातील सांडपाणी नाल्याची कुठल्याही प्रकारची साफसफाईची कामे पूर्ण केली जात नाही. त्यांतच गावातील काही भागातील परिसरात तननाशक फवारणी न केल्याने घरांच्या सभोवताली  मोठ- मोठे गवत उगवत आहे. या सर्व बाबींचा विचार ग्रामपंचायत व आरोग्य कर्मचारी/सेवक यांच्यात समन्वय  नसल्याने सर्वत्र घानीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे .त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने नागरिकांना या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.

No comments:

Post a Comment