चिपळूण मधील नागरिकांना लालच दाखवणाऱ्या एजंट कंपुच्या पोलीस चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 12, 2020

चिपळूण मधील नागरिकांना लालच दाखवणाऱ्या एजंट कंपुच्या पोलीस चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे

 चिपळूण मधील नागरिकांना लालच दाखवणाऱ्या एजंट कंपुच्या पोलीस चौकशीची जोर धरू लागली आहे मागणी ...


ओंकार रेळेकर-चिपळूण

 चिपळूण शहरात दामदुप्पट लाभ आणि अव्वाच्या सव्वा व्याजाचे प्रलोभन देवून सामान्यांचे कोट्यावधी रुपये लाटण्यात आले. मात्र या कथित बोगस वित्तीय संस्थांची बोगस माहिती लोकांपर्यंत नेवून गुंतवणूकीस भाग पाडणाऱ्या एजंट कंपूची पोलीसांनी चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.*

चिपळूणात गेल्या २० वर्षात जवळपास दहावर वित्तीय संस्था आल्या व त्यांनी येथीलच स्थानिक एजंटाच्या जीवावर पोसल्या गेल्या. चिपळूणात केवळ एजंटगिरी करणारा ठराविक कंपू आहे. हाच कंपू वेगवेगळ्या संस्थात आपले बस्तान बसवित आले आहेत. त्यांना जवळपास ४० टक्के कमीशन व इतर् खूप फायदे लाटतात. ज्यामध्ये परदेशी वारीचा समावेश असतो. हा ठराविक एजंटचाच कंपू सर्वसामान्य लोकांना भूलथापा मारून, आमीष दाखवून गुंतवणूक करावयाची गळ घालतात व त्यांच्याच जीवावर बक्कळ कमाई करत आले आहेत. काहींकडे मुंबई, पूणेत ब्लॉक व गाड्या तसेच दागदागिने आहेत. या सर्व एजटांच्या जमवलेल्या संपत्तीची आणि प्रॉपर्टीची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

अलिकडेच महाराष्ट्र बाहेरील अशाच एका वित्तीय संस्थेचा संशयास्पद व्यवहारावरून काही एजंट पुढे आले आहेत. वास्तविक गुंतवणूक करुन घेण्यापूर्वी या एजंटांनी खात्री करून का घेतली नाही? असाही प्रश्न गुंववणूकीदारांकडून विचारला जात आहे. या एजंटांनी जे मोठ कमीशन गेल्या काही वर्षात लाटले आहे ते व एजंटावरच कारवाई करून गुंतवणूकदारांची रक्कम परत करावी अशी जोरदार मागणी होत आहे. यातील ठराविक एजंट आपण लोकांबरोबर आहोत असे भासवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

No comments:

Post a Comment