महाराष्ट्र मिररचा दणका,जिल्हा शल्यचिकित्सक यांची तडकाफडकी बदली - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 9, 2020

महाराष्ट्र मिररचा दणका,जिल्हा शल्यचिकित्सक यांची तडकाफडकी बदली

                महाराष्ट्र मिररचा दणका 

सातारा सिव्हिल सर्जनची तडकाफडकी बदली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश

मिलिंद लोहार /कुलदीप मोहिते
महाराष्ट्र मिरर टीम सातारा

महाराष्ट्र मिररच्या पाठपुराव्याला अखेर मोठं यश आलं आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सातारा सिव्हिल सर्जन डॉक्टर अमोल गडीकर  यांची तडकाफडकी बदली केली आहे
आज शरद पवार व मंत्री टोपे हे कराड दौऱ्यावर असताना कोल्हापूर व कराडच्या कोरोना संदर्भात आढावा घेत असताना आरोग्य मंत्री टोपे यांनी सातारचे सिव्हिल सर्जन अमोल गडीकर यांची तडकाफडकी बदली केली आहे गेल्या चार दिवसापासून सिव्हील हॉस्पिटलमधील होणारे वेगवेगळे प्रकार महाराष्ट्र मिरर जनतेसमोर मांडत होता सिव्हील हॉस्पिटलमधील कोरोना पेशंटचे हाल तसेच टॉयलेटमध्ये संशयास्पदरीत्या मृतावस्थेत स्त्री जातीचे अर्भक आढळल्यानंतर या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप निर्माण झाला होता त्यानंतर  सिव्हिल हॉस्पिटल मधील मकवाना हा जाने ते अर्भक बाहेर काढले त्याचा आत्महत्येचा प्रयत्न असे बरेच काही सर्व होत असताना सिव्हिल हॉस्पिटलमधील भोंगळ कारभार कधी थांबणार ?असे वाटत असतानाच महाराष्ट्र मिररने याचा सतत पाठपुरावा केला आज शरद पवार व आरोग्य मंत्री टोपे यांच्या उपस्थितीत यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर अमोल गडीकर त्यांची बदली केली आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यातून सर्व स्तरातून सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या भोंगळ कारभाराबद्दल चर्चा होऊ लागली आ.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अशोक गायकवाड हे आक्रमक दिसले सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी आवाज  उठवला तसेच आरपीआय जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले या सर्व पार्श्वभूमीवर सिव्हिल सर्जन अमोल गडीकर यांच्या तडकाफडकी बदलीमुळे थोडातरी न्याय मिळाल्यासारखं वाटत आहे परंतु सिव्हिल हॉस्पिटलमधील भोंगळ कारभार यापुढे कसा चालेल हे अनुत्तरीतच आहे.
आमचे सात्ताऱ्याचे प्रतिनिधी मिलिंद लोहार यांनी इथल्या भोंगळ कारभाराची लक्तरे महाराष्ट्र मिररच्या माध्यमातून मांडल्याने ही बाब चव्हाट्यावर आली आणि महाराष्ट्र मिररच्या या लढ्याला मोठं यश आलं आहे.थेट बांधीलकी आपल्याशी हे ब्रीद वाक्य सार्थ करत महाराष्ट्र मिरर जनतेशी बांधील असल्याचे सिद्ध झालं आहे

No comments:

Post a Comment