Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सातारा जिल्ह्यात पत्रकारांचा उठाव कोरोनाने मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला 50 लाखांच्या विम्याची मागणी .


सातारा जिल्ह्यात पत्रकारांचा उठाव कोरोनाने मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला 50 लाखांच्या विम्याची मागणी .

 प्रतीक मिसाळ-

महाराष्ट्र मिरर टीम सातारामहाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतरही राज्यातील कोरोनाने बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना ना पन्नास लाखांची मदत मिळाली ना पत्रकार विमा योजना सुरू केली गेली . त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असून तो व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाभर जोरदार उठाव केला . विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर , साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदन देवून तातडीने पत्रकारांच्या विम्याची मागणी करण्यात आली . मराठी पत्रकार परिषदेने महाराष्ट्रात आंदोलनाची हाक दिली . त्याला सर्वांत मोठा प्रतिसाद सातारा जिल्ह्याने दिला सातारा जिल्ह्यातील 11 ही तालुक्यांमधील पत्रकार संघांनी त्या त्या तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन दिले . तर सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात विधान परिषदेचे सभापती  रामराजे निंबाळकर , सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील , साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह , जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते , आ . शशिकांत शिंदे यांना निवेदन दिले. 

आरोग्य मंत्री ना राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना कोरोना योद्धे असलेल्या पत्रकाराचे कोरोनाने निधन झाले तर त्याच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत देण्याची घोषणा केली होती . मात्र , राज्यात आतापर्यंत 27 पत्रकारांचे बळी कोरोनानं घेतले असले तरी एकाही पत्रकाराच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची काय दमडीची ही मदत सरकारकडून मिळाली नसल्याने पत्रकारांमध्ये मोठा संताप आहे . सातारा जिल्ह्यातही कराडचे मोहन कुलकर्णी यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे . राज्यातील पत्रकारांच्या कुटुंबांना सरकारने तातडीने मदत करावी , अशी मागणी यावेळी करण्यात आली . पत्रकारांना विमा कवच देण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी घोषणा केली होती . मात्र , बाबतही कोणताच निर्णय सरकारने घेतला नसल्याने राज्यातील पत्रकार अडचणीत आहेत कोविड सेंटरमध्ये योग्य सुविधा मिळत नाहीत आणि खासगी रूग्णालयातील महागडे उपचार परवडत नाहीत अशा कात्रीत पत्रकार सापडले आहेत योग्य उपचार न मिळाल्याने पुण्यात पांडुरंग रायकर तर माथेरानमध्ये संतोष पवार या दोन पत्रकारांचे निधन झाले . त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणीही जिल्हा पत्रकार संघाने केली . शुक्रवार सकाळपासून सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी आरोग्य मंत्री ना राजेश टोपे यांना ठरल्याप्रमाणे मेसेज करून मागणी केली . त्यानुसार सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी मेसेज करुन त्यांच्यावर भडीमार केला कोरोनाने मृत्यू झालेल्या दिवंगत पत्रकारांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली .यावेळी  साताऱ्यातील या आंदोलनावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे , कार्याध्यक्ष शरद काटकर सरचिटणीस दीपक प्रभावळकर , सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी , ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण , सुजित आंबेकर , राहुल तपासे , ओंकार कदम , तुषार तपासे , दीपक दीक्षित , संतोष नलावडे , प्रशांत जगताप , चंद्रसेन जाधव , मोहन मस्कर - पाटील , अरुण जावळे प्रतीक भद्रे , सनी शिंदे , किरण मोहिते , साई सावंत , ओंकार गिरी , अनुराग धिवार जावेद खान , आतीष चतुर , प्रकाश वायदंडे, महेश क्षीरसागर , प्रकाश शिंदे , ओंकार सोनवले , तबरेज बागवान रिजवान सय्यद यांच्यासह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते . 

सभापतींनी राज्य शासनाला निर्देश द्यावेत ... राज्यातील पत्रकार अडचणीत आहेत . 27 जणांचा बळी गेला आहे . घोषणेची अंमलबजावणी राज्य शासनाने केली पाहिजे . राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे सभापती म्हणून आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व राज्य शासनाला तातडीने निर्देश द्यावेत अथवा तशी बैठक बोलवावी , अशी मागणी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे केली आपण तातडीने राज्य सरकारशी चर्चा करु असे यावेळी ना रामराजे यांनी सांगितले . अकराही तालुक्यात आंदोलन . सातारा जिल्हा पत्रकार संघाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये पत्रकार संघांनी आपापल्या भागातील पत्रकारांना बरोबर घेवून फिजीकल डिस्टन्स पाळत तहसीलदार व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले ग्रामीण भागातील पत्रकारांची व्यथा या निवेदनात मांडण्यात आली . तर एसएमएसद्वारे ग्रामीण भागातील हजारो पत्रकारांनी आरोग्य मंत्र्यांनाही पत्रकार विमा योजनेबाबत मेसेज केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies