दोन चिमुकल्यांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Wednesday, September 30, 2020

दोन चिमुकल्यांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

 दोन चिमुकल्यांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

सर्वत्र हळहळ व्यक्त

निलेश पवार-महाडमुंबई - गोवा महामार्गालगत महाड औद्योगिक वसाहतीमध्ये एका बंद होंडा सिटी कारमध्ये गुदमरल्याने दोन लहानग्या सख्ख्या  भावांचा मृत्यू झाला आहे. काल सांयकाळी ही काळीज पिळवटणारी घटना घडली.

सोहेल जकात खान(वय ५ वर्ष) आणि अब्बास जकात खान(वय ३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्या या लहानग्यांची नावे आहेत. नांगलवाडी येथे एक भंगाराचे गोदाम असुन येथे एक होंडा सिटीकार नंबर एम एच . o४ बि. के . ७५३७ ही बंदकार उभी होती या कारमध्ये सात  वाजण्याच्या सुमारास खेळत असताना अब्बास व सोहेल यांच्या हातून अचानक गाडीचा दरवाजा आतून लॉक झाला. या दोघांनाही बंद गाडीचे दरवाजे आणि काचा उघडणे शक्य झाले  नाही. यामुळे गाडीमध्ये  गुदमरून त्या दोघांचा मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती समजताच औद्योगिक वसाहत पोलिसांनी आणि साळुंके रेस्क्यू टीमचे प्रशांत साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेत या दोन्ही मुलांना बाहेर काढले परंतु ते दोघे मरण पावले होते .  महाडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी  नेले आहेत. याप्रकरणी औद्योगिक पोलीस ठाण्यात या दोन मुलांच्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करित आहेत. या हदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ शोक व्यक्त होत आहे 

 

No comments:

Post a Comment