रत्नागिरीचे नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी स्वीकारला पदभार.... - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, September 22, 2020

रत्नागिरीचे नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी स्वीकारला पदभार....

 रत्नागिरीचे नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी स्वीकारला पदभार....


 ओंकार रेळेकर-रत्नागिरीरत्नागिरीचे नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मंगळवारी रत्नागिरीचा पदभार स्वीकारला. अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले.

मूळचे पंजाब मधील संगरूर  जिल्ह्यातील असलेल्या डॉ. गर्ग यांनी सुद्धा वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर जनसेवेसाठी पोलीस क्षेत्र निवडले. 2014 च्या बॅचमधील आयपीएस असलेल्या गर्ग यांनी सुरुवातीला मणिपूर येथून कामाला सुरुवात केली तर 2018 मध्ये ते महाराष्ट्र येथे कार्यरत झाले. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक होण्यापूर्वी श्री गर्ग हे गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.

तेथे त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. त्यानंतर एस पी पहिले पोस्टिंग त्यांना रत्नागिरीत मिळाले असून त्यांच्या पत्नी इंदुमती जाखड या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

क्राइम रेट कमी असलेल्या रत्नागिरीमध्ये सामाजिक सलोखा आणि सामाजिक प्रश्नाचे स्वरूप अधिक असताना डॉ गर्ग त्याकडे कसे पाहणार आणि निष्पक्ष काम कसे करणार याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:

Post a Comment