महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडी शर्यत सुरू व्हावी खासदार श्रीनिवास पाटील - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Wednesday, September 23, 2020

महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडी शर्यत सुरू व्हावी खासदार श्रीनिवास पाटील

 महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडी शर्यत सुरू व्हावी  खासदार श्रीनिवास पाटील


कुलदीप मोहिते -कराड


महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैल गाडी शर्यत पुन्हा एकदा सुरु  व्हावी या मागणीचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना भेटून दिले आहे.


बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत असल्याचे यावेळी मंत्री गिरीराज सिंह यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या या शर्यती सुरु व्हाव्यात त्यासाठी केंद्रीय सरकारकडे सातत्यातने पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले


महाराष्ट्राची सुमारे ४०० वर्षांची परंपरा, बैलगाडी शौकिन व मालक यांच्या भावना, देशी गोवंशाचे रक्षण व ग्रामीण पर्यटनाला चालना या हेतूने ‘बैल’ या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतील समावेश वगळावा, यामुळे बैलगाडी शर्यती पुन्हा सुरु होतील, अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना यावेळी करण्यात आली. यावेळी खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते

No comments:

Post a Comment