माणदेशचा "मरीन ड्राईव्ह" ओसंडून वाहू लागला - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, September 12, 2020

माणदेशचा "मरीन ड्राईव्ह" ओसंडून वाहू लागलामाणदेशचा "मरीन ड्राईव्ह" ओसंडून वाहू लागला

मिलिंदा पवार-खटावराजेवाडी   नदीवरील देवापूर नजिकचा राजेवाडी हा सर्वात मोठा तलाव आज पहाटे भरुन सांडव्यातून पाणी वाहू लागले‌ आहे.लोकांना मारिन ड्राईव्हचा अनुभव मिळाला .

माण तालुक्याच्या पुर्व भागातील देवापूर नजिकचा हा तलाव १४० वर्षापुर्वी देशाच्या स्वातंत्र्य पुर्व ब्रिटीश राजवटीत प्रिन्सेस व्हिक्टोरिया यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आला.तत्कालीन भीषण दुष्काळी संकटात या परिसरातील रयतेला रोजगार निर्मिती व पाणी टंचाई  निवारण हा प्रमु़ख या मागील उद्देश साध्य करण्यात आला होता.

या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे या तलावाचे पाणलोट क्षेत्र सातारा जिल्हयात, सांडव्यातील पाणी पुढे माण नदीतून वाहत जाते‌ सांगली जिल्ह्यात तर तलावाच्या कॅनोलचे पाणी जाते सोलापूर जिल्ह्यात.

सातारा-सांगली-सोलापूर असे तिन जिल्हे या तलावाचे ला़भार्थी आहेत.

No comments:

Post a Comment