Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

बाळा कदम यांच्या दणक्याने एसटी कामगाराला मिळाला न्याय

 बाळा कदम यांच्या दणक्याने एसटी कामगाराला मिळाला न्याय                  

पगार मिळून देण्याच्या आगारप्रमुखांच्या लेखी  आश्वासनानंतर  सूर्यकांत माने यांचे उपोषण मागे

 बाळा कदम यांच्या आक्रमक पावित्र्याने महामंडळ प्रशासन आले ठिकाण्यावर

ओंकार रेळेकर-चिपळूण

 


मागील दोन दिवस चिपळूण आगारात आमरण उपोषणास बसलेल्या कामगार सेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या मदतीला फक्त शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनीच धाव घेऊन संबंधित यंत्रणेला धारेवर धरत उपोषणकर्ते माने यांना न्याय मिळवून दिला आहे.

------------------------------------------------------

*येथील* महामंडळाच्या रत्नागिरी विभागाच्या कारभाराची पोलखोल करताना सज्जड दमच कदम यांनी या यंत्रणेला भरला कामगार सेनेच्या कामगारांवरील अन्याय सहन करणार नाही असा इशारा देताना याचा आगारप्रमुखाना जाब विचारताच पगार मिळवून देण्याचे लेखी आश्वासन आगाराप्रमुखांनी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले असून बाळा कदमाच्या दणक्याने महामंडळ रत्नागिरी विभागाची यंत्रणा मात्र ताळ्यावर आली

  शिवसेना कामगार सेनेचे माजी विभागीय उपाध्यक्ष आणि चिपळूण आगाराचे चालक श्री  सूर्यकांत माने हे जून महिन्याचा अठरा दिवसाचा पगार न मिळाल्याने आमरण उपोषणास बसले होते कामगार सेनेचे पदाधिकारी आणि महामंडळाच्या पदाधिकारी यांच्यासह स्थानिक प्रशासन याच्याकडे उपोषणाचे पत्र दिले होते मात्र कुणीही दखल न घेतल्याने त्यानी दोन दिवस उपोषण सुरू केले कामगार सेनेचे चिपळूण आगार अध्यक्ष राजू खेतले याच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही पदाधिकारी या उपोषणाकडे फिरला नाही तर या उपोषणावर प्रचंड दबाव आणून उपोषणकर्ते याना धमक्या देण्यात येत होत्या मात्र राजू खेतले यांनी चोख उत्तर देत उपोषण सुरू ठेवले होते मात्र या सऱ्याची खबर विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम यांना मिळताच केवळ त्यानी या ठिकाणी आपले सहकारी यांच्यासह धाव घेतली 

   उपोषणकर्ते माने आणि राजू खेतले यांच्यासह अन्य सदस्य याच्याजवल चर्चा करून साऱ्यांना घेऊन थेट आगारप्रमुख यांनाच जाब विचारला बाळा कदम यांच्या एन्ट्रीनेच आगारात एकच खळबळ उडाली तर सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे कोमजलेले चेहरे ही काही क्षणात खुलले गेले

    महामंडळाचा नियम राज्याला एकच ना की वेगवेगळे आहेत असा सवाल बाळा कदम यांनी थेट कोल्हापूर ,सांगली सिधुदुर्ग आशा ठिकाणी आगारात संपर्क साधून पगार मिळाल्याचे आगारप्रमुखांना दाखवून दिले यावेळी रत्नागिरी विभागाचे अधिकारीही हे सारे मोबाईलवरून ऐकत होते बाळा कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्मी घाव घातल्या नंतर या यंत्रणेचे बिंग फुटले आणि पगार देण्याचे अश्वासन देणार आहात की नाही सांगा असा जाब संबंधितांना विचारताच महामंडळाची यंत्रणा जाग्यावर आली आणि आम्ही पत्र देतो मात्र उपोषण मागे घेण्याची विनंती केली 

     विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम आगार अध्यक्ष राजू खेतले याच्या उपस्थित  अगरप्रमुख यांनी पत्र दिल्याने हे उपोषण सायंकाळी सहा वाजता स्थगित करण्यात आले 

    बाळा कदम यांनी वेळीच धाव घेऊन दणका दिल्याने या उपोषणावर तोडगा निघाला अन्यथा साऱ्यांनी दुर्लक्ष केलेल्या उपोषणकर्ते माने हे आजारी असल्याने नको ती आफत आली असती  मात्र बाळा कदम याच्या दणक्याने माजी पदाधिकारी याना न्याय देताना रत्नागिरी विभागाला ही जोरदार दणका दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies