जिल्हा नियोजन अधिकारी पदी जयसिंग मेहेत्रे रुजू - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, September 17, 2020

जिल्हा नियोजन अधिकारी पदी जयसिंग मेहेत्रे रुजूजिल्हा नियोजन अधिकारी पदी जयसिंग मेहेत्रे रुजू

      महाराष्ट्र मिरर टीम -अलिबाग जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा कार्यभार श्री.जयसिंग दत्तात्रय मेहेत्रे यांनी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांच्याकडून आज सकाळी कार्यालयीन वेळेत स्वीकारला. यापूर्वी जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांची बदली झाल्यामुळे जिल्हा नियोजन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता.  

      श्री.सर्जेराव मस्के-पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त जिल्हा नियोजन अधिकारी श्री.जयसिंग मेहेत्रे यांचे स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, संशोधन सहाय्यक परिचय देसाई हे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment