Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोकणातील मच्छिमारांना कोरोना, निसर्गचक्रीवादळ व आता समुद्री वादळाचा फटका.

 कोकणातील मच्छिमारांना  कोरोना,   निसर्गचक्रीवादळ व आता समुद्री वादळाचा  फटका.अमोल चांदोरकर - श्रीवर्धन


महाराष्ट्र राज्य सरकारने मच्छिमारांना मासेमारी करण्यासाठी १  ऑगस्ट २०२०  पासून अधिकृतरित्या परवानगी दिली असली तरी कोरोना, निसर्ग चक्रीवादळ व आता  अतिवृष्टी व समुद्री वादळांच्या फटाक्यांमुळे मच्छीमार आता उद्ध्वस्त झालेला आहे. मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे.

सरकारी उदासीनता तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छीमारी व्यवसाय उद्ध्वस्त झाला असल्याचे मच्छिमारांनाचे म्हणणे आहे. गतवर्षीचे चक्रीवादळ, अवकाळी पाऊसाच्या नुकसानातून बाहेर निघत नाही, तोवर मच्छिमारांना कोरोनामुळे झालेल्या अतोनात नुकसानाला सामोरे जावे लागले  होते.त्यात महाराष्ट्र सरकार कडून १४० कोटी रुपयांचा डिझेल परतावा मंजूर होऊनही अद्याप मिळालेला नाही. त्याच प्रमाणे सतत  होत असलेल्या अनेक नैसर्गिक आपत्ती मुळे मच्छीमार हा त्रस्त झाला आहे. 

मच्छीमार कोळी बांधव मच्छीमारीवर आधारित असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिक यांची फार दयनीय अवस्था  झाली आहे. अनेक वेळा समुद्री छोटे मोठे वादळे आले की त्यामुळे मच्छिमारांनाचे कंबरडे मोडले जाते. आपल्या जीवाची पर्वा न करता नौकाना लागणारे डिझेल, बर्फ, ऑईल , भत्ता इत्यादी जीवनावश्यक वस्तू नौकामध्ये घेऊन खोल समुद्रात मासेमारीसाठी जात  असतो.

परंतु खोल समुद्रात जाऊन सुध्दा मासे मिळत नासल्याने निराश होऊन अनेक वेळा  रिकाम्या हाताने परत फिरावे लागते आहे. अनेक वेळा खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊन सुध्दा रिकामे आल्याने होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुळे  नोकरांचे पगार, डिझेल, ऑईल, भत्ता, जाळी खर्च व कर्जाचे थकलेले   हप्ते या सर्व परिस्थितीने मच्छिमारांनावर आसमानी संकट आले आहे. 

नेहमीच गजबजलेल्या मच्छिमारांचे बंदरावर सर्वत्र शुकशुकाट पसरलेला दिसत आहे. कोकणातील मच्छिमारांमुळे कोट्यवधी रूपयांचे परकीय चलन मिळवून देणारा हा मासेमारी व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. रायगड सहीत श्रीवर्धन तालुक्यातील मच्छीमारी ठप्प झाली आहे.आज मच्छिमारांवर उपासमारिची वेळ आली आहे.  याची दखल शासन दरबारी  घेऊन तातडीने आर्थिक मदतीचा हात द्यावा.


परिणामी कोळीबांधवाची उपासमाराची पाळी आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे व कोरोनाच्या महासंकाटामूळे  मच्छीमारी व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे. 

नवीन हंगाम सुरू करण्याच्या मनस्थितीत नसतांना सुध्दा जीवाचे नाव शिवा ठेवून बॅंक व व्यापारी यांच्या कडून आर्थिक अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज घेऊन पुन्हा एकदा समुद्रामध्ये आपआपले नशीब अजमावण्यासाठी समुद्रात मासेमारी साठी नौका तयार केल्या आहेत.

सतत होत असलेला समुद्रातील नैसर्गिक बद्दल व समुद्री वादळे , खराब हवामान आणि  दररोज पडणारा पाऊस यामुळे

सध्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिघी , कुडगाव, आदगाव, भरडखोल, दिवेआगर, जीवना बंदर, मुळगाव, दांडा विभाग, बागमांडला इत्यादी ठिकाणच्या मच्छिमारांनी आपआपल्या नौका किना-यावर सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत.

निसर्ग चक्रीवादळा मध्ये अनेक मच्छिमारी नौका समुद्रात बुडाल्या अनेक नौकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.  लाखो रुपयांचे नुकसान झाले. सरकार  ह्या निसर्ग चक्रीवादळा मध्ये झालेल्या नौकाना फक्त दहा हजार रुपये नुकसान भरपाई दिली.  मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं आहे. मच्छिमारांना पॅकेज जाहीर करण्यात येत नाही. मच्छीमारी आज पुर्णपणे ठप्प  झाली आहे. मच्छीमार ह आर्थिक संकटात सापडले आहेत . त्यासाठी शासनाने आर्थिक सहाय्य होण्याच्या प्रतीक्षेत मच्छीमार बांधव आहेत. 

श्रीकृष्ण मच्छीमारी संस्थेचे चेअरमन  बाळकृष्ण रघूवीर    :-


कोकणातील मच्छीमार हा उद्ध्वस्त झाला आहे. दैनंदिन होत असलेला नौंकाचा खर्च , खलाशी वर्गाचा पगार व थकलेले बॅंक हप्ते यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने शेतकरी बांधवांप्रमाणा मच्छिमारांना सुध्दा आर्थिक मदत करावी.

 

कधी पाहिले नव्हते एवढी दयनीय अवस्था मच्छिमारांची झाली आहे.  नवीन हंगाम सुरू करतांना मच्छिमारांनी काठावरची कसरत केली आहे अजूनहि समुद्रात अनेक छोटी मोठी वादळे होत असल्यामुळे मच्छीमार भयभीत झाले आहेत.

मच्छीमार   नेते हरिदास वाघे  भरडखोल मच्छीमार नेते  हरिओम चोगले :-


कोकणातील  मच्छीमारी हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. यावर आमचे व छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या कुटूंबाचे उदरनिर्वाह चालत असतो. कोरोनाचे संकट व पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळ व पुन्हा आता समुद्री वादळे 

यामुळे आज उपासमारिची वेळ आली आहे. आम्हांला आत्महत्या करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. तरी शासनाने आमच्या मच्छिमारांचा गांभीर्याने विचार करावा आणि आर्थिक सहाय्य  द्यावे अशी मच्छिमारांची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies