युवावक्ते जळकोटे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले अर्सेनिक अल्बम थर्टी गोळ्यांचे वाटप. - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, September 26, 2020

युवावक्ते जळकोटे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले अर्सेनिक अल्बम थर्टी गोळ्यांचे वाटप.

 युवावक्ते जळकोटे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले  अर्सेनिक अल्बम थर्टी गोळ्यांचे वाटप.

महाराष्ट्र मिरर टीम-उस्मानाबाद
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित व्यक्ती आढळुन आल्याने संपुर्ण गावात खळबळ उडाली होती त्या अनुषंगाने  परिसरामध्ये कोरोनाला आळा बसण्या बरोबरच  रोग  प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयद्वारा देण्यात येणाऱ्या अर्सेनिक अल्बम 30 ह्या गोळ्यांचे  किलज येथील युवावक्ते तथा रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेचे सदस्य पत्रकार राम जळकोटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाटप करण्यात आले.


यावेळी गावातील अमोल होणराव, प्रल्हाद सगर, सुमित कोने, सुशीलकुमार कोनाळे, सौरव कोनाळे हे उपस्थित होते.

दरम्यान सामाजिक बांधिलकी बाळगून कोरोना सारख्या महामारीत केलेल्या मदती बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment