Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा नियम न पाळणार्‍या निर्मात्यांना निर्वाणीचा इशारा

 अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा नियम न पाळणार्‍या निर्मात्यांना निर्वाणीचा इशारा 

महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई



नुकतेच सातारा येथे ‘आई माझी काळूबाई’ च्या सेटवर २७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने व त्याचे शूटिंग करतांना जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोना मुळे निधन झाल्याने सर्व थरातून शुटिंगच्या ठिकाणी काळजी घेत नसल्या बद्दल चिंता व्यक्त करण्यात येत असल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व्यथित झाले असून त्यांनी अश्या निर्मात्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.



“केंद्र व राज्य सरकार यांनी कोविड -19 साठी आखून दिलेल्या नियमांचे पालन न करता काही निर्माते शुटींग करत असल्याचे आढळून आल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ संतप्त झाले असून. लवकरच भरारी पथके स्थापन करून अचानक ही पथके शुटिंगच्या सेटवर जाऊन केंद्र व राज्य सरकारने शूटिंग साठी आखून दिलेले नियम पाळले जात आहेत की नाही याचे निरीक्षण करतील व तसे नियम पाळले जात नसतील तर पोलिसांच्या मदतीने त्वरित शूटिंग थांबवण्यात येईल” असे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले मोठ्या “मिनतवारी नंतर केंद्र व राज्य सरकारकडून शूटिंग साठी आपण परवानगी मिळवलेली आहे मात्र काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत आहे असे आढळल्याने अशा निर्मात्यांना आम्ही निर्वाणीचा इशारा देत आहोत.”


कोणत्याही प्रकारचे शूटिंग करावयाचे झाल्यास सर्वप्रथम कलेक्टर व पोलिसांची परवानगी अनिवार्य असून, परवानगीशिवाय कोणीही शूटिंग करू नये सेट वरील लहान मुले व ज्येष्ठ कलावंतांची विशेष काळजी घेण्यात यावी त्यांच्या बाबतीत हयगय झाली तर कोर्ट सुद्धा त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करू शकेल. आपण शूटिंग सोबतच चित्रपटगृहे, नाट्यगृहे व इतर सर्व कलावंतांचे असणारे प्लॅटफॉर्म सरकारने सुरू करावेत यासाठी प्रयत्नशील आहोत परंतु आपल्याच अनास्थेने व काळजी न घेण्याच्या वृत्तीने या प्रयत्नांना खीळ बसत आहे पुन्हा लॉक डाऊन सुरू झाला तर आपल्या क्षेत्रातील सगळ्यांचेच पुन्हा वाईट हाल चालू होतील त्यामुळे सगळ्यांनी आत्ताच खबरदारी घ्यावी ही विनंती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies