यापेक्षा जनावरं सुद्धा चांगल्या ठिकाणी राहतात. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 16, 2020

यापेक्षा जनावरं सुद्धा चांगल्या ठिकाणी राहतात.

 


यापेक्षा जनावरं सुद्धा चांगल्या ठिकाणी राहतात.

उमेश पाटील -सांगलीहे दृश्य आहे आपल्या महाराष्ट्रातील.

गाव : पुनवत, (ता. शिराळा, जि. सांगली) 


पैलवान गणपतराव आंधळकर या नावाने पुनवत गावाची ओळख आख्ख्या पश्चिम महाराष्ट्राला झाली.


परंतु, 

वरील विदारक दृश्य ही खरी या गावाची वास्तव दुर्दशा आहे. 


यामागील कारण काहीही असो.

भावकीतील वाद. 

व्यक्तिगत हेवेदावे. 

गावपुढाऱ्यांचे निराशाजनक वर्तन. 

किंवा प्रशासकीय सेवकांचा हलगर्जीपणा.


याच्याशी आपल्याला काही देणंघेणं नाही, म्हणणं चुकीचे ठरेल. कारण देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ७० वर्षानंतर आपल्या आजूबाजूचे लोक अशा  दुर्दशेत राहतात, ही गोष्ट किती अत्यंत संतापजनक आहे. भयंकर आहे.

आपण किती मागासलेल्या जगतोय याची साक्ष देणारे आहे. 

( यापेक्षा कितीतरी चांगल्या सुविधा जनावरांना पुरवली जाते.) 


यामागे काही व्यक्तिगत कारणे असलेली ऐकायला मिळतात. ग्रामपंचायतमध्ये वारंवार फेऱ्या मारून सुद्धा ग्रामपंचायतीचे प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक याकडे लक्ष देत नाहीत, असेही काहींचे म्हणणे आहे. 


ते काहीही असो, 

मत मागायला येणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांपासून आमदार खासदारांपर्यंत प्रत्येकाने याकडे लक्ष देणे मला गरजेचे आहे. लोकसेवक म्हणून. त्यांचे मूलभूत कर्तव्य म्हणून. आणि

जिल्हाधिकाऱ्यांसह, तहसिलदारांनी  पण आपल्या आजूबाजूची लोकं कशात तऱ्हेने आणि कशा परिस्थितीत राहतात याकडे सुद्धा  गांभीर्याने पहायला हवे. (आपली बुवा बदली होणार, तेव्हा कशाला लक्ष घाला असल्या भानगडीत असा विचार न करता. ) कारण  राजकारणी मंडळींना कायद्याची आणि संविधानाची माहिती सनदी अधिकाऱ्यांइतकी नसते. प्रशासकीय सेवक वेगवेगळ्या सनदी परीक्षा देऊन पास झालेले असतात. त्यांना संविधानाने लोकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांबद्दल चांगले ठाऊक असते.

तेव्हा किमान त्यांनी तरी याकडे लक्ष द्यावे, ही माफक अपेक्षा. 


(हडप्पा मोहंजदाडो संस्कृतीमध्ये सुद्धा व्यवस्थित गटारींची सोय होती. मात्र आज एकविसाव्या शतकात आपली दुर्दशा चिंतनीय आहे. ) संविधानात निर्देशित केलेल्या पायाभूत सुविधा तरी माणूस म्हणून आम्हाला मिळाव्यात ही अपेक्षा.

No comments:

Post a Comment