चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांची शहापूर ठाणे ग्रामीण येथे प्रशासकीय बदली - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 30, 2020

चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांची शहापूर ठाणे ग्रामीण येथे प्रशासकीय बदली

 चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांची शहापूर ठाणे ग्रामीण येथे प्रशासकीय बदली


ओंकार रेळेकर-चिपळूणयेथील उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांची शहापूर उपविभाग ठाणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. सुरुवातीपासूनच नवनाथ ढवळे यांनी गुन्हेगारी, चोऱ्यांची प्रकरण उघडकीस आणण्यात यश मिळवले. कोरोना परिस्थितीमुळे लॉकडाऊन परिस्थितीत यशस्वीपणे हाताळलेली कायदा सुव्यवस्था  यामुळे  श्री. ढवळे यांची या ठिकाणची कारकीर्द यशस्वी ठरली आहे.  


गेल्या सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी असलेल्या डॉक्टर शितल जानवे यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर या ठिकाणी आणि कोल्हापूर येथून सुरज गुरव यांची वर्णी लागली. यानंतर सुरज गुरव यांनी तिवरे धरण दुर्घटनेनंतर याठिकाणी बजावलेली महत्वपूर्ण कामगिरी तसेच आपल्या सहकाऱ्यांसमवेत परिसर स्वच्छ करण्यात घेतलेला अग्रेसर सहभाग. विशेष म्हणजे चिपळूण नगर परिषदेतील सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी श्री. सावंत खून प्रकरणाचा  गुंतागुंतीचा केलेला उलगडा यामुळे उपविभाग चिपळूणमध्ये सुरज गुरव यांच्या कर्तुत्वाची छाप पडली होती. अल्पावधीतच सुरेश गुरव यांची कराड येथे तर नवनाथ ढवळे यांची याठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून वर्णी लागली. 


उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी देखील सुरुवातीपासूनच आपल्या कर्तृत्वाची छाप पाडण्यात सुरुवात केली. येथील सर्व सर्वसामान्यांशी सलोख्याचे संबंध ठेवत सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला तसेच चोऱ्या, दरोडे, खून यांसारखी गुन्ह्यांची प्रकरण सहकाऱ्यांना सोबत घेऊन उघडकीस आणण्यात यश मिळवले. यामध्ये गुहागर बँक महिला व्यवस्थापिकेचा व पिंपर येथील खून प्रकरण, गोवंश हत्या प्रकरण, अवैध धंद्यांवर केलेल्या धडक कारवाई, तसेच विधानसभा निवडणूक, कोरोना संकटाच्या काळात देखील आपल्या अन्य अधिकारी सहकाऱ्यांना सोबत घेऊन येथे यशस्वीपणे केलेली कामगिरी एकंदरीत आपल्या कारकिर्दीत सर्वसामान्यांना एक प्रकारे शिस्त लावली. शांत संयमी व शिस्तप्रिय असलेले तसेच सर्वसामान्यांमध्ये कायद्याचा आदरयुक्त धाक ठेवून असलेले नवनाथ ढवळे यांची शहापूर उपविभाग ठाणे ग्रामीण येथे प्रशासकीय बदली झाली आहे.  महाराष्ट्रात उपविभागीय पोलिस अधिकारी, सहाय्यक पोलिस उपायुक्त  असलेल्या १०५ अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत यामध्ये चिपळूणचे पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment