Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सातारा होणार कलरफुल!!! सातारा मेकिंग ग्रुपचा अनोखा कन्सेप्ट

सातारा होणार कलरफुल!!!

सातारा मेकिंग ग्रुपचा अनोखा कन्सेप्ट


कुलदीप मोहिते-सातारा



सह्याद्री डोंगर रांगांच्या  कुशीत वसलेले सातारा सुपरकुल शहर आता होत आहे कलरफुल.

सातारा शहराची ओळख म्हणजे डोंगर-दऱ्या, किल्ले, राजवाडे, कास पठार, प्राचीन मंदिरे , स्मारके आणि सातारचे आल्हाददायक वातावरण! यामुळेच दरवर्षी अनेक पर्यटक सातारा शहराला भेट देतात. लोक सुंदर ठिकाणांना भेटी देतच असतात. सातारा शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. ती म्हणजे, रंगांच्या मदतीने. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. पण, ज्या शहराने आपल्याला हवे असणारे, आपल्या आवडीचे रंग दिले. त्याला मात्र आपण कधी कामाच्या गडबडीत, तर कधी वैयक्तीक आयुष्याची कोडी सोडवण्याच्या विवंचनेत विसरतो.



 'मेकिंग सातारा' ग्रुपने सातारा शहर आणखी सुंदर बनविण्याचा विडा उचलला आहे. या मोहिमेत तरुणाईचा मोठा सहभाग असून या ग्रुपच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणं रंगवण्याचं काम सुरु आहे. दर रविवारी शहरात हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती ग्रुपच्यावतीने नेहा शिरकांडे यांनी दिली. सातारा शहराला अधिक सुंदर व रंगीबेरंगी बनवूया, रंगून जाऊ रंगात आता होऊ स्वैरस्वच्छंद, साताऱ्याच्या अंगणात आता उधळू रंगाने आनंद, या स्लोगन खाली हा ग्रुप कार्यरत आहे. 

 शिरकांडे म्हणाल्या, सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आहे. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत नागरिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आपली काळजी घेत आहेत. गेली सात-आठ महिने लोक घरीच राहून कोरोना विषाणूवर मात करत आहेत. मात्र, हे करत असताना घरी बसून लोक कंटाळले आहेत, लोकांच्या मनात भीती आहे, तर काही जण या लाॅकडाउनचा योग्य लाभ घेऊन आपापली कामं घरी राहून करत आहेत, यातून त्यांच्यात असलेला कलाकार, लेखक जागा होत आहे. त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्याचबरोबर सातारला सुंदर बनण्याचा हा एकमात्र उद्देश आहे

 आपण प्रत्येकाने जर यात खारीचा वाटा उचलला तर सातारा शहर सुंदर बनण्यास वेळ लागणार नाही. आपलं शहर स्वच्छ, सुंदर ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाला याची जाणीव असणं देखील गरजेचं आहे. 'एनीबडी अॅण्ड एव्हरीबडी कॅन पेंट'च्या घोष वाक्यात आपण या मोहिमेचा शुभारंभ सदरबझार येथील भिंती रंगवून केला. या मोहिमेत तरुणांचा मोठा वाटा आहे, तर बालचमूंनी देखील सहभाग नोंदवला आहे. दर रविवारी आपण एकत्र जमून सातारा शहरातील विविध भिंती रंगवून सातारच्या सौंद-यात भर घालणार आहोत. आपणही सर्वजण या मोहिमेत सहभागी होऊयात आणि शहराला सुंदर बनवूयात.  दरम्यान, आपल्याला सातारकर म्हणून विशेष ओळख देणाऱ्या या शहराचे आपण सर्वांनी आभार मानुयात, असेही 'मेकिंग सातारा ग्रुप'च्या नेहा शिरकांडे यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies