कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले माणचे गुरुजी - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, September 22, 2020

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले माणचे गुरुजीकोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले माणचे गुरुजी

मिलिंदा पवार-खटाव

 माण तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत 'कोविड -१९' शी लढण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केले होते. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला असून शिक्षकांनी २ दिवसात २ लाख ३० हजार रुपयांची मदत गोळा केली आहे. हा मदतीचा ओघ अद्यापही सुरूच असून यातून जम्बो ऑक्सिजन सिलेंडर, मशीनसह विविध प्रकारची मदत प्रशासनास प्रांतअधिकारी अश्विनी जिरंगे,तहसिलदार महेश पाटील,गटविकास अधिकारी गोरखनाथ शेलार, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत चौगले ,सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर,वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय गोंदवले डॉ. किसन कदम, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते,विस्तार अधिकारी संगिता गायकवाड, केंद्रप्रमुख नारायण आवळे, अंकुश शिंदे तसेच सर्व शिक्षक- शिक्षिका यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आली.सुरुवातीला फक्त शहरात असणारा कोरोनाचा प्रसार खेड्यापाड्यातही मोठ्या प्रमाणात झाला आहे. रुग्णसंख्या वाढल्याने गरजू, गोरगरीब रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत.माण सारख्या दुष्काळी, डोंगराळ तालुक्यातील ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे.ऑक्सिजनची उपलब्धता अत्यंत

आवश्यक अशी बाब झाली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राणी मुकावे लागले आहे. यासर्व गोष्टींचा विचार करून शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन सोशल मीडियावर शिक्षकांना आवाहन केले होते. त्यानुसार भरघोस प्रतिसाद देत शिक्षकांनी फक्त दोन दिवसात २ लाख ३० हजार रुपयांची मदत गोळा केली आहे. जमा झालेली रक्कम तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मागणीनुसार तालुक्यात एकही जंबो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नाही म्हणून 7 जम्बो सिलेंडर मदत म्हणून देण्याचे सर्वनुमते ठरवण्यात आले.विशेष म्हणजे ही सर्व मदत रोख व ऑनलाईन खात्यावर जमा करण्यात आली आहे. तसेच मदत केलेल्या शिक्षकांचे नाव, त्यांनी केलेल्या मदतीची आकडेवारी दररोज प्रसिद्ध करून एकूण मदत किती झाली, हे लगेच प्रसिध्द करून पारदर्शकपणे जाहीर करण्यात येत आहे. अजूनही मदतीचा ओघ अव्याहत सुरू असून उर्वरित शिक्षकांनी,सामाजिक संस्था व समाजातील विविध घटकांनी या चांगल्या उपक्रमात सहभागी होऊन कोरोना लढ्यास हातभार लावावा, असे आवाहन सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment