हॅलो मेडीकलच्या वतीने करण्यात येत आहे गावागावामध्ये जनजागृती - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Wednesday, September 23, 2020

हॅलो मेडीकलच्या वतीने करण्यात येत आहे गावागावामध्ये जनजागृती

 हॅलो मेडीकलच्या वतीने करण्यात येत आहे गावागावामध्ये जनजागृती

राम जळकोटे-उस्मानाबाद

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील हॅलो मेडिकल फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाने संकल्पनेस आणलेल्या माझं कुटुंब माझी जबाबदारी या नव्या उपक्रमाला आता तालुक्यातील गावागावात लोकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, आणि सुरक्षित रहावे याबद्दल माहिती देण्यात येत आहे. हॅलो मेडिकल फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष. डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या माध्यमातून तालुक्यातील गावागावात हे जनजागृतीचे फलक लावण्यात येत आहेत.            तसेच कोरोनाच्या वाढत्या महामारीच्या काळात या संस्थेच्या वतीने लोहारा आणि तुळजापूर तालुक्यातील ७० गावांना जवळपास ८०० गरजू कुटुंबाना किराणा साहित्य ,२०० एकल महिलांना सोयाबीन पेरणीसाठी ५००० रुपयांची मदत,आणि ३०० निराधार लोकांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. 

तसेच या वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे काही संबंधित आजार जाणवत असल्यास प्रशासनाने दिलेल्या टोल फ्री नंबर वरती त्वरित संपर्क साधायचा आहे तसेच तुळजापूर तालुक्यातील  हॅलो मेडिकल फाऊंडेशन चे तुळजापूर तालुका समन्वयक बसवराज नरे आणि 

लोहारा तालुका समन्वयक सतीश कदम समन्यवक  यांनी  गाव पातळीवर नेमणूक केलेल्या संस्थेच्या कार्यकर्त्याना संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच माझं कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाचा आपण सर्वांनी फायदा घेऊया असा संदेश देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment