Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी घेतला पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा तपासण्या वाढवून रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचना

 ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी घेतला पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा
तपासण्या वाढवून रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्या
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचना

 

 उपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरआरोग्य मंत्री राजेश टोपेकामगार मंत्री दिलीप वळसे पाटीलराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

 

 कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्या 

 मास्क  वापरणाऱ्यांकडून दंड वसूल करा

      


तरोनिश मेह्ता

महाराष्ट्र मिरर टीम पुणे 


कोरोनाच्या अनुषंगाने तपासण्यांची क्षमता वाढवून बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्यायला हवेतअशा सूचना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केल्या.


      कोविड 19 विषाणू प्रादूर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना  कार्यवाहीबाबत पुण्यातील विधानभवन सभागृहात आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरआरोग्य मंत्री राजेश टोपेकामगार मंत्री दिलीप वळसे पाटीलसार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आलीयावेळी खासदार श्रीपवार बोलत होते.

      बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळपिंपरी चिंचवड च्या महापौर उषा उर्फ माई ढोरेकेंद्रीय उच्चपदस्थ अधिकारी डॉसुजितकुमार सिंह  सहसंचालक संकेत कुलकर्णीविभागीय आयुक्त सौरभ रावजमाबंदी आयुक्त एसचोक्कलिंगमपोलीस आयुक्त डॉके.व्यंकटेशमपुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमारपिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकरअतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवालजिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटीलजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादआरोग्य विभागाच्या संचालक डॉअर्चना पाटीलससून चे प्र.अधिष्ठाता डॉमुरलीधर तांबेवैद्यकीय सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर  जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन खासदार शरद पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्याते म्हणाले,  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणावर भर द्यायला हवाबाधित रुग्णांवर जलदगतीने उपचार मिळवून द्यायला हवेतत्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रभावीपणे घ्यायला हवाकोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृती भर द्यावाकोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहेबरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतातही गंभीर बाब आहेमास्क शिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावाअशा सूचना खासदार शरद पवार यांनी दिल्या.

      खासदार शरद पवार म्हणालेमॉलबसस्थानकरेल्वे स्थानकमोठी दुकाने याठिकाण च्या प्रवेशद्वारावर आरोग्य तपासणी बंधनकारक करावीबांधून तयार असणाऱ्या इमारतींचा उपयोग कोविड उपचार केंद्रासाठी करता येऊ शकेलअसेही त्यांनी यावेळी सांगितले


केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणालेदेशात सर्वात जास्त रुग्णदर आणि रुग्णवाढीचा वेग पुण्यात आहेही चिंतेची बाब आहेपुण्यातील रुग्णदर  रुग्णवाढीचा वेग कमी करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र व्यवस्थापनशासकीयखाजगी  जम्बो हॉस्पिटलचे प्रभावी व्यवस्थापन याबरोबरच जनजागृतीवर भर द्यावाकोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांचे संदेशपर व्हिडीओ सोशल माध्यमातून प्रसारित करावेतजेणेकरून लोकांमधील भीती कमी होईलकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित असून  नागरिकांनी समाजात वावरताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहेमास्क शिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांकडून पोलीस विभागाने दंड वसूल करावा,असेही त्यांनी सांगितले.

      आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, 'माझे कुटुंब माझी जबाबदारीही मोहीम राज्यात 15 सप्टेंबर पासून राबविण्यात येणार आहेविविध पथके स्थापन करून त्यांच्यामार्फत ही मोहीम राबवण्यात येणार आहेयात लोकप्रतिनिधीनगरसेवकस्वयंसेवी संस्था  नागरिकांचा सहभागदेखील महत्वाचा आहेअसे सांगून श्रीटोपे म्हणालेलक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठी बेड अडविला जाणार नाहीयाची दक्षता घ्यावीरुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णाच्या तब्बेतीची माहिती नातेवाईकांना समजावीयादृष्टीने रुग्णालयांनी खबरदारी घ्यावीअसे सांगून राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून सहकार्य मिळावेअशी अपेक्षा श्री टोपे यांनी व्यक्त केली.

                 डॉसुजित सिंह यांनी प्रतिबंधित क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या..


      विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील आजवरचे बाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यू दरतपासण्यांची संख्याप्लाझ्मा थेरपी तसेच कोरोना व्यवस्थापनाच्या दृष्टीने पुढील नियोजनाबाबत माहिती दिली.

 

      पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिलीलवकर निदान होऊन रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने तपासण्या वाढवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies