Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कराड तालुक्यातील औंढ येथील आत्महत्याप्रकरणी जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी घेतली तातडीने मृत मुलीच्या घरच्यांची भेट

 कराड तालुक्यातील  औंढ   येथील आत्महत्याप्रकरणी जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी घेतली तातडीने मृत मुलीच्या घरच्यांची भेट


कुलदीप मोहिते -कराड




कराड तालुक्यातील  ओढ  येथील 15वर्षीय मुलीने ऑनलाईन शिक्षणाकरता मोबाईल न मिळाल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याच्या बातमीने अख्खा महाराष्ट्र हादरून सोडला या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी तातडीने प्रतिक्षा नाव बदललेले तिच्या घरी जाऊन भेट घेतली व तिच्या कुटुंबियांचे सांत्वन केले



ओंड येथील पंडित गोविंद वल्लभ पंत विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या प्रतिक्षा नाव बदललेले(वय १५) या मुलीने आत्महत्या केल्यानंतर माध्यमांमधून या घटनेतील वास्तव समोर आले आणि सर्वचजण हादरून गेले. या पार्श्वभूमीवर आज क्षीरसागर यांनी ओंडला धाव घेतली. प्रतिक्षाच्या घरी भेट दिल्यानंतर त्यांनी गोविंद वल्लभ पंत विद्यालयासही भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 


जिल्ह्यात कोरोनाच्या काळात सुरु असलेल्या ऑनलाईन अभ्यासाचा पालक, विद्यार्थी यांनी कसलाही ताण न घेता आनंददायी शिक्षण घ्यावे, आपल्याकडे स्मार्ट फोन नसला तरी शासनाने सुरु केलेल्या पर्यायी अभ्यासक्रमाचा वापर करुन शिक्षणाच्या प्रवाहात रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


यावेळी उपशिक्षणाधिकारी श्रीकांत जगदाळे, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, विस्तार अधिकारी नितीन जगताप, सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे, निमंत्रक जगन्नाथ कुंभार, तालुका अध्यक्ष सुधाकर चव्हाण, संघाचे राज्य हिशोबनीस भरत मोजर उपस्थित होते.


सातारा जिल्ह्यात शाळानिहाय केलेल्या सव्र्हेमध्ये ६३ टक्के पालकांकडे स्मार्ट फोन आहेत अशी माहिती मिळाली. ३२ टक्के पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत, तर ५ टक्के पालकांकडे मोबाईल, टीव्ही काही नाही. अशा मुलांनी आपले मित्र, मैत्रीण यांच्याकडे जावून अभ्यास समजावून घेवून पुस्तकातील अभ्यास करावा. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात रहावेत यासाठी अनेक पर्यायी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. 


दूरदर्शनवर टीलीमिली कार्यक्रम, युट्यूब चॅनेल, जिओ टीव्ही, दिक्षा अ‍ॅप, शिक्षण उपसंचालक यांनी सुरु केलेला ‘शाळा बंद शिक्षण सुरु’ या उपक्रमाची लिंक दररोज पाठवली जाते. त्यावरसुध्दा अभ्यास दिला जातो, असे क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्याकडील पाठयपुस्तकांचे वाचन करुन स्वयंअध्ययन करावे व शिक्षण सुरु ठेवावे. शंका आल्यास आपले विषय शिक्षक यांना साध्या फोनवरुन विचारून शंकेचे निरसण करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies