Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

वादळाची दहशत लोक म्हणतात पुन्हा नकोरे बाबा!, २०२० हे वर्षच खराब

 वादळाची दहशत लोक म्हणतात पुन्हा नकोरे बाबा!, २०२० हे वर्षच खराब


  रविंद्र कुवेसकर -उतेखोल/माणगांव,




भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात १३ ते १७ ऑक्टोबर असे पाच दिवस विजेच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत तात्काळ सूचना देण्यात आल्या जेणेकरुन मनुष्यहानी टाळता येईल. सावधानतेचा इशारा आल्या पासून जनते मध्ये खुपच चिंतेचे वातावरण आणि भिती पसरली आहे. लोक म्हणतात पाऊस किती पण कोसळूदेत पण वादळ नकोरे बाबा ! सगळ्यांच्या तोंडी एकच वाक्य, "२०२० हे वर्षच खराब !" असल्याचे ऐकू येत आहे.


आपत्ती व्यवस्थापण सतर्क झाले आहे. सुरक्षितते विषयी संदेशाद्वारे सर्व सूचना देण्यात आल्याने वेगळे वातावरण अनुभवायला मिळत आहे. आणखी किती संकट सोसावी लागणार या वर्षात अस बोलल जात आहे. वादळ आलच तर पून्हा कसा सामना करायचा याची सोशल माध्यमांवर देखील चर्चा सुरु आहे. निसर्ग चक्रीवादळाची प्रचंड भिती प्रत्येकाच्या मनात बसली आहे. दूधाने पोळलेला ताक देखील फूकून पितो ! असाचा काहीसा अनुभव या वादळाच्या दहशती मुळे सगळीकडे पाहावयास मिळत आहे.


लोक मोबाईलवर विंडी डाॅट काॅम तसेच इतर वेगवेगळ्या ॲप्लिकेशन वरुन हवामानाचा व वादळ कुठून कुठे चाललय याबाबत अंदाज घेत चर्चा करत आहेत. यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या इशाऱ्यानुसार ताशी २५ ते ५५ कि. मी. वेगाने किंवा जास्तीत जास्त किनार पट्टीलगत ७० कि. मी. अतिवेगाने वारे वाहतील असा अंदाज वर्तविला जात आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या जुण्या आठवणी पुन्हा आठवल्याने लोक धास्तावले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies