आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाला मेडिकल किट चे वाटप - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, October 19, 2020

आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाला मेडिकल किट चे वाटप

 

आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाला मेडिकल किट चे वाटप

प्रतिक मिसाळ -सातारा

 सातारा:कोरेगाव विधानपरिषद चे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाला व्हिटॅमिन सी च्या एक लाख गोळ्या , व्हिटॅमिन डी प्लस झिंक च्या एक लाख गोळ्या पाच हजार मास्क १०० कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर चे वाटप करण्यात आले . हे सर्व साहित्य सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांच्या कडे सुपूर्द केले . यावेळी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी आमदार शिंदे यांनावाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . सातारा जिल्ह्यात मार्चपासून कोव्हीड -१ ९ मुळे पोलीस प्रशासनावर खूप मोठा ताण आला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलीस दलातील सैनिक लॉकडाऊन मध्ये कार्यरत आहेत . हे कोरोना योद्धे दिवसरात्र काम करत आहेत . त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सर्वांचा मी आणि सर्व सातारकर ऋणी आहे . ड्युटी करत असताना कोरोना पासून दूर राहण्यासाठी ही छोटीशी मदत आज वाढदिवसानिमित्त केली . असे आमदार शिंदे म्हणाले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री गोरखनाथ नलावडे, पंकज मिसाळ,ऍड सागर जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment