Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रायगडात परतीच्या पावसाचे थैमान, वीज पडून एक कामगाराचा मृत्यू

 

रायगडात परतीच्या पावसाचे थैमान, वीज पडून एक कामगाराचा मृत्यू

महाराष्ट्र मिरर टीम रायगड



रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने गुरुवारी सांयकाळी विजांच्या कडकडाटासह अक्षरशः घमासान केलं असून नागोठण्यात वीज पडून एका कामगाराचा मृत्यू झाला तर  माथेरान मध्ये काही दुकानांमध्ये पाणी शिरलं,कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात उरलीसुरली भाताची पिके ही शेतात आडवी करून मोठया प्रमाणात शेतात पाणी साचल्याने पेढा सुद्धा कुजून गेला आहे.खोपोली खालापूर मध्ये सांयकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने इथेही भात पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान केलं आहे.तर काही ठिकाणी बत्ती ही गुल झाली होती.



नागोठण्यात वीज पडून आदिवासी तरुणाचा मृत्यू 

नागोठणे परिसर गुरुवारी (दि.२२) सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान ढगाचा व वीजांचा गडगटाने दणाणून गेला असतानांच नागोठणे मोहल्ल्यात बांधकाम ठेकेदाराकडे काम करत असलेला एका तरुणावर वीज कोसळल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.


नागोठण्याजवळील कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील कातळावाडी या आदिवासी वाडीवरील रहिवासी वामन बाळू शिद ( वय३७) हा तरुण नागोठणे येथील एका बांधकाम ठेकेदाराकडे मजुरीने कामास जात होता. आज तो नागोठणे मोहल्ल्यात एका ठिकाणी बांधकाम काम करण्यासाठी गेला होता. सायंकाळी वीजा चमकत असताना तो आपला मोबाईलवर गाणी ऐकत असताना अचानक त्याच्या मोबाईलवर वीज पडली. त्यामुळे वामनला जोराचा शॉक बसला.



त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी त्याला नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ आणले. परंतु वामन मृत झाला असल्याचे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कोळी यांनी सांगितले. दरम्यान ढगात वीजांचा गडगडाट होऊन वीजा चमकत असतील तर कुणीही आपला मोबाईल ऑन ठेऊ नका तात्काळ बंद करा असे आवाहन यावेळी डॉ. श्रीमती स्नेहल कोळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies