राष्ट्रवादी पक्षातर्फे पत्रकारांना कोविड योध्दा सन्मानपत्र देवून गौरव - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 20, 2020

राष्ट्रवादी पक्षातर्फे पत्रकारांना कोविड योध्दा सन्मानपत्र देवून गौरव

 राष्ट्रवादी पक्षातर्फे पत्रकारांना कोविड योध्दा सन्मानपत्र देवून गौरव

रविंद्र  कुवेसकर-उतेखोल/माणगांव 


कोव्हिड-१९ वैश्विक संकट काळी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी प्रशासन व राज्य सरकारच्या खांद्याला खांदा लावून आपल्या लेखणीद्वारे जनजागृतीचे काम सचोटीने प्रामाणिकपणे जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले. तसेच ३ जुन २०२० चे निसर्ग चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांनी केलेल्या कामामुळे मोलाची मदत झाल्याची दखल घेत, माणगांव मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या काल झालेल्या आढावा बैठकीचे औचित्याने कुणभी भवन येथे राष्ट्रवादी पक्षाचे माणगांव तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे यांच्या संकल्पनेतून पत्रकारांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. 

  यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पत्रकारांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले तर खासदार  सुनिल तटकरे यांनी आपत्ती व कोरोना संकटकाळात लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणुन गणल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या लेखणीतून आंम्हाला चांगल काम करता आल, असे सांगत पत्रकारांचे विशेष अभिनंदन केले आहे.  या प्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे, पक्षाच्या जिल्हाध्यक्षा गीता पालरेचा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, जि. प. सभापती गीता जाधव, माणगांव तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, तालुक्याच्या महिला अध्यक्षा संगीता बक्कम, जेष्ठ नेते शेखर देशमुख, प्रभाकर उभारे, जिल्हा युवती अध्यक्षा ॲड. सायली दळवी, तालुक्यातील सर्व, सरपंच, नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वच पत्रकारांचा सन्मान करण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment