महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्ती मिळावी यासाठी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार आता जनजागृती. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, October 29, 2020

महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्ती मिळावी यासाठी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार आता जनजागृती.

 महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्ती मिळावी यासाठी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार आता जनजागृती.

राम जळकोटे-तुळजापूर


 रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान हे गेली अनेक दिवसांपासून महिलांचे प्रश्न , अडीअडचणी,माहवारी(मासिकपाळी)-शाप की वरदान,तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा याबद्दल  महिलांमध्ये जागृती निर्माण करणे,याकरिता शाळा कॉलेज, तसेच महिला बचतगट यांकरिता प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी शिबिराचे आयोजन केले जात आहे.

महिलांना हिंसाचारापासून सुरक्षितता देणे, त्यांना घरात सुरक्षितता लाभावी व त्यांना बेघर केले जाऊ नये,तसेच महिलांच्या आधिकाराची कडक अंबलबजावणी व्हावी ही काही महत्वाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान काम करत आहे.

पीडित महिला या आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्थानकात जात असतात.अशा समस्त महिलांना मदतीचा हात देणेकामी,समोपदेशन करण्यासाठी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान सदैव सेवेची ठायी तत्पर आहोत असे सांगण्यात आले.

प्रतिष्ठानच्या अध्यक्षा. अश्विनीताई महांगडे यांनी या उपक्रमाची सुरुवात ही प्रथम सातारा पोलीस अधीक्षक. तेजस्विनी सातपुते आणि पोलीस उपनिरीक्षक वाई उपविभाग.अजित टिके यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र देऊन विनंती केली. त्यांनतर रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या टीमच्या वतीने महाराष्ट्र भरतील सर्व पोलीस स्थानकाला हे पत्र देऊन विनंती करण्यात आली.

प्रत्येक माणसाच्या तोंडात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असते पण मात्र तेच शिवविचार आपण आपल्या रोजच्या जीवनात आमलात आणतो का हा प्रश्नच आहे. स्त्रियांचा आदर करण्याचा संस्कारच आपल्याला छत्रपती. शिवाजी  महाराजांनी दिला असून त्याची आठवण सर्वानी ठेवली पाहिजे. महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.असा पीडित महिलांना हिंसाचार विरोधात लढणे,रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान हे वेळोवेळी मदत करत आहेत आणि राहिलंच असा विश्वास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा. अश्विनीताई महांगडे, उपाध्यक्ष. निलेश जगदाळे, प्रवक्ते. प्रमोद कारकर, यांनी पोलीस स्टेशन तसेच पीडित महिलांना दिला .समाजात तळागाळात जाऊन काम करीत असताना बहुतांश महिला "कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे  संरक्षण कायदा २००५ नियम २००६" या कायद्याबाबत अनभिज्ञ असल्याचे आढळून येत आहे.सदर संरक्षण कायद्याची संपूर्ण माहिती देणे कामी प्रतिष्ठानने आजवर अनेक शिबिराचे आयोजन ही केले आहे.आणि इथून पुढे सुद्धा करीत राहू असे आवाहन रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्षा. अश्विनीताई महांगडे यांनी केले आहे.

यानंतर  प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या उपक्रमासाठी आपल्या स्थानिक पोलीस स्टेशन ला पत्र देऊन विनंती करायला सुरुवात केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील  रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे सदस्य  राम जळकोटे  यांनी तुळजापूर तालुका पोलिस स्टेशन मध्ये प्रतिष्ठान च्या महीलांविषयी समस्या, अत्याचार या विषयी जनजागृती व शिबीरं घेणे या उपक्रमाची माहीती तसेच पोलीस स्टेशल ला आलेल्या महिलांविषयी केस ची माहीती प्रतिष्ठानला देणेबाबत अशा सर्व उपक्रमांची माहीती देत पत्र दिले. पोलीस निरीक्षक. हर्षवर्धन गवळी  साहेबांनी पत्र वाचून उपक्रमाला आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले व शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment