कडेगाव तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले
काही गावातील ऊस भुईसपाट झाले.
उमेश पाटील -सांगली
संपूर्ण कडेगाव तालुक्याला रविवारी दुपारी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले. कडेगाव शहरसह तालुक्यात रविवारी दुपारी बारा वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरा पर्यंत व सुरुच होता. तालुक्याच्या ग्रामीण भागात देखिल कमी अधिक प्रमाणात पावसाचे असेच चित्र होते. मुसळधार पावसाने ओढे, नाले भरून वाहत होते. अनेक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. येरळा आणि नांदणी नदीपात्र दुथडी भरून वाहत होते.
गेली दोन दिवसात तालुक्यात वातावरण ढगाळ होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कडेगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या कडकडाटासह वीजा चमकत होत्या. सायंकाळी उशिरा पर्यंत पाऊस सुरूच होता. कडेगाव तालुक्यातील सोनहिरा खोरे,नेलीँ खोरा,सोनहिरा ओढा परीसर शाळगाव नेवरी परिसरात पावसाने अनेक ठिकाणी ओढे, नाले भरून वाहत होते. अनेक बंधारे भरून वाहू लागले आहेत. कराड -विटा रस्त्यावरील हणमंतवडीये. व अमरापूर जवळील नदिच्या नवीन रस्ता होत असल्याने भराव व पाईपवरून पाणी वाहून जात असल्याने वाहतूक बंद होती. यासह अनेक रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती.
येरळा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते. कराड रस्त्यावर हायवेचे काम सुरु आहे. याठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यानंतर रस्ता वाहतूक बंद झाली. नांदणी नदीचे पात्र देखील पावसाच्या पाण्याने दुथडी भरून वाहत होते. तालुक्यातील दोनही नद्यांच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. या पावसाने खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके धोक्यात आली आहेत.