वाहतूक व्यावसायिकांच्या सदैव पाठीशी राहणार : भास्कर जाधव
ओंकार रेळेकर-चिपळूण
चिपळूण, खेड तालुका वाहतूक व्यावसायिक संघाच्या आज चिपळूण येथे झालेल्या कार्यक्रमाला आमदार भास्कर जाधव यांना आग्रहपूर्वक निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात आज राजकारणात विविध पदे भूषवित असलो तरी आपण एक ट्रक व्यावसायिक होतो, असे सांगून ४० वर्षांपूर्वीची गाड्यांची स्थिती आणि आज बदललेली परिस्थिती यावर त्यांनी भाष्य केले आणि अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचवेळी वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेने एक निश्चित भूमिका घ्यावी, आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, जिल्हा परिषद सदस्य तथा संघटनेचे उपाध्यक्ष अरुण चव्हाण, संघटनेचे अध्यक्ष बुवा सावंत, उपाध्यक्ष संभाजी खेडेकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment