दोन्ही हातांनी लेखन उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल, प्राथमिक शिक्षिका उज्ज्वला म्हस्के यांना 'टीचर इनोव्हेशन ' राष्ट्रीय पुरस्कार . - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, October 6, 2020

दोन्ही हातांनी लेखन उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल, प्राथमिक शिक्षिका उज्ज्वला म्हस्के यांना 'टीचर इनोव्हेशन ' राष्ट्रीय पुरस्कार .

 दोन्ही हातांनी लेखन उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल,
प्राथमिक शिक्षिका उज्ज्वला म्हस्के यांना
 'टीचर इनोव्हेशन ' राष्ट्रीय पुरस्कार .

संतोष सुतार-माणगांव            रायगड जिल्हा परिषद शाळा रिले शाळेच्या शिक्षिका उज्वला म्हस्के(धुळगुंडे) यांना स्टेट इनोव्हेशन आणि रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र ,सर फौंडेशन टीचर इंनोवेशन  यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय  पुरस्कारासाठी त्यांची निवड जाहीर झाली आहे.

                स्टेट इंनोवेशन अँड रिसर्च फौंडेशन तर्फे दरवर्षी  शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर फाउंडेशन तर्फे टीचर इनोव्हेशन हा राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.दरवर्षी  संपूर्ण देशभरात ह्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.विदयार्थी गुणवत्ता आणि संशोधन या क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बद्दल हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. 2020 च्या या पुरस्कारासाठी उज्वला गणेशराव म्हस्के(धुळगुंडे) यांची निवड झाली आहे.महाराष्ट्रातून अंगणवाडी ते अधिकारी या स्तरावर ही स्पर्धा आयोजित केली जाते.

उज्वला म्हस्के यांनी आपल्या विध्यार्थ्याना दोन्ही हाताने लिहिण्यासाठी प्रेरित करून आपल्या शाळेत त्यांनी हा उपक्रम यशस्वी केला आहे.त्यांनी चिमणी संवर्धन हा प्रयोगही यशस्वी केला आहे.विविध उपक्रमशील व तंत्रस्नेही असलेल्या उज्वला म्हस्के यांना या

वर्षीचा 2020 चा शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा असा  पुरस्कार जाहीर झाला असून लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर मान्यवरांचे हस्ते नियोजित कार्यक्रमात तो प्रदान करण्यात येणार आहे.त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर ,सर्व शिक्षक आणि सर्व स्थरातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

     
हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे.दोन्ही हाताने लेखनाने मानसिक व भावनिक विकास चांगला होतो.विद्यार्थी चौकस होतात व अभ्यासाला वेगळी दिशा मिळते.या उपक्रमात विध्यार्थ्यानी चांगला प्रतिसाद दिला आहे.या पुरस्काराचे सर्व श्रेय त्यांचे आहे.
उज्वला म्हस्के (धुळगुंडे)
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका.

No comments:

Post a Comment