Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी साताऱ्यातील राजघराण्याचा विजयादशमीचा शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द

 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी साताऱ्यातील राजघराण्याचा विजयादशमीचा शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द

सोशल मिडियाद्वारे केले आवाहन

              प्रतिक मिसाळ -सातारा

सोशल मिडिया द्वारे पोस्ट करून पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली की,शिवप्रभु छत्रपतींच्या राजगादीची विजयादशमी चे दिवशी सिमोल्लंघनाची पूर्वापार चालत आलेली परंपरा तितक्याच तोलामोलाने आम्ही पुढे चालु ठेवली आहे . हा शाही सिमोल्लंघन सोहळा सातारकर आणि सर्वसामान्य जनतेचा मोठा उत्सव ठरला आहे . यावेळी विधीवत श्री भवानी तलवारीचे पूजन जलमंदिर पॅलेस येथे झाल्यावर या ऐतिहासिक तलवारीची जलमंदिर ते पोवईनाका अशी पालखीतुन मिरवणुक काढण्यात येवून , पोवईनाका येथे सिमोल्लंघनाचे विधीवत पूजन करण्यात येते . पूजन झाल्यावर परत ही पालखी जलमंदिर पॅलेस येथे आल्यावर पूजा - अर्चा झाल्यावर राजघराण्यातील सर्व सन्माननीय सदस्य हे समस्त सातारकरांच्या आपटयाच्या पानांचा स्विकार करतात आणि त्यानंतर समस्त सातारकर नागरीक सोने लुटतात अशी ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा सोहळा मोठया उत्साहात आणि प्रथा - परंपरेप्रमाणे साजरा केला जात असतो . 
हा एक जनतेचा उत्सव असतो तथापि यंदाच्या कोरोनाच्या भीषण परिस्थित कोणताही धोका पत्करणे आवश्यक वाटत नसल्याने , यंदाचा रविवार दिनांक २५/१०/२०२० रोजी होणारा विजयादशमी शाही सिमोल्लंघन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . राजघराण्यावर प्रेम निष्ठा असणा - या हितचिंतक , कार्यकर्ते नागरीक , जेष्ठ व्यक्ती आदी सर्वांनी नोंद घेवून सहकार्य करावे.असे आव्हान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies