मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, October 9, 2020

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार

          

        मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार


महाराष्ट्र मिरर टीम -खोपोलीमुंबई पुणे एक्स्प्रेस वे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत.किमी 36 वर अमृतांजन ब्रिज आणि फुडमॉल जवळ हे अपघात झाले आहेत .
पहिल्या अपघातात पुण्याहून मुंबईच्या दिशेने साखर घेऊन निघालेला ट्रक कलंडला त्यात एक जण ट्रकखाली दबून ठार झाला  आणि एक जण जखमी झालाय तर दुसऱ्या अपघातात
एक ट्रेलर दुसऱ्या ट्रेलरला पाठीमागून धडकल्याने या अपघातातही एक जण ठार एकजण जखमी झालाय.जखमींना विजय भोसले आणि टीमने खोपोली येथे हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी हलवले आहे.पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
या अपघातात बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, लोकमान्य हॉस्पिटलची यंत्रणा, स्थानिक युवक आणि अपघातग्रस्तांच्या मदतीला या टीमच्या सदस्यांनी मदत केली.


No comments:

Post a Comment