ऑल इडिया धनगर समाज महासंघाचा धनगर आरक्षण लढ्याला जाहीर पाठींबा- प्रदेशाध्यक्ष- प्रवीण काकडे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, October 5, 2020

ऑल इडिया धनगर समाज महासंघाचा धनगर आरक्षण लढ्याला जाहीर पाठींबा- प्रदेशाध्यक्ष- प्रवीण काकडे

ऑल इडिया धनगर समाज महासंघाचा धनगर आरक्षण लढ्याला   जाहीर पाठींबा- प्रदेशाध्यक्ष- प्रवीण काकडे

 

दत्ता शेडगे-खोपोलीधनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी गेले 70 वर्ष धनगर समाज हा रस्ता रोको,चक्काज्याम आंदोलन, मोर्चे आदी  विविध प्रकारे आंदोलन करीत आहेत, मात्र सगळ्याच सरकारने धनगर समाजाचा फक्त वापर करीत मतांचे राजकारण करून आपली वेळ साधून घेतली  आहे, मात्र आता  धनगर समाज बांधव जागृत झाला असून धनगर आरक्षण लढ्याला आतापासून खरी सुरुवात झाली आहे  या आरक्षण लढ्याला ऑल इंडिया धनगर महासंघाचा जाहीर पाठींबा राहिले असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले आहे, ते खालापूर तालुक्यातील खैराट येथील शालेय विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते,

   देशात  कोरोना व्हायरस ने  मोठे थैमान घातले असून यामुळे गोर गरीब वंचित, खेड्यापाड्यात राहणारे  विद्यार्थी हे  ऑनलाईन शिक्षणापासून  कोणीही वंचित राहू नये यासाठी  ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या वतीने आज खैराट येथील  गोरगरीब 45 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले,  तर या संघटनेच्या वतीने पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील 700 विद्यार्थ्यांना  खेड्या पाड्यात, वाड्या वस्त्यांवर जाऊन शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले,     यावेळीं ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र पुकळे, जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव कचरे,  रायगड जिल्हा मीडिया प्रमुख महादेव कारंडे, युवक आघाडी अध्यक्ष किशोर झोरे,  पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विजय सरक, उपाध्यक्ष तुकाराम कोकरे, खालापूर तालुका अध्यक्ष ठकुराम झोरे, कर्जत तालुका अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, मावळ तालुका अध्यक्ष बाबूराव शेडगे, सामाजिक कार्यकर्ते गणेश गोरे विठ्ठल मरगले, आदींसह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.No comments:

Post a Comment