कर्जतमधील मटका-जुगार बंद झालाच पाहिजे ; नारी शक्तीचा एल्गार कर्जत पोलिसांना निवेदन सादर - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, October 2, 2020

कर्जतमधील मटका-जुगार बंद झालाच पाहिजे ; नारी शक्तीचा एल्गार कर्जत पोलिसांना निवेदन सादर

 कर्जतमधील मटका-जुगार बंद झालाच पाहिजे ; नारी शक्तीचा एल्गार

कर्जत पोलिसांना निवेदन सादर

नरेश कोळंबे -कर्जत           कर्जत शहरात राजरोजपणे मटका-जुगार तसेच अवैध दारू विक्री सुरु आहे. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे तसेच ते बंद झाले पाहिजे अशी मागणी महिला नारीशक्ती संघटनेनी निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली आहे.


    शहरातील पाटील आळी, खाटीक आळी असे दोन ठिकाणी तर फातिमा नगर भिसेगाव, गुंडगे आणि दहिवलीमध्ये खुलेआम मटका-जुगार खेळाला जात असल्याची माहिती नरी शक्ती संघटनेला मिळाली . पोलिसांनी जरी या आड्डयावर कारवाई केली तरी फक्त एक महिना भर मटका-जुगार बंद ठेवायचा आणि परत सुरु करायचा आणि जास्तीत जास्त ठिकाण बदलले जाते. यामुळे या मटका जुगार खेळण्याच्या नादी लागून तरुण पिढी  झटपट पैसा कामविणाच्या नादात  भरकटत आहे, अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे आणि हे रोखण्यासाठी महिला नारीशक्ती संघटनांनी आवाज उठवीत हे अवैध चालविणारे मटका-जुगार अड्डे कायमचे बंद झाले पाहिजे आणि त्यांच्यावर जास्तीतजास्त कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पोलीस ठाण्याचे एपीआय एस.जे. देठे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

             या प्रसंगी ज्योती जाधव, स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे ,अर्चना हगवणे, कमल जाधव, वर्षा डेरवणकर,  आशा गाडे, मालती वाडगावकर , सीताराम गाडे आदी महिला उपस्थित होत्या.


No comments:

Post a Comment