केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचं निधन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, October 8, 2020

केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचं निधन

 केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचं निधन

वृत्तसंस्थालोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं गुरुवारी निधन झालंय. मृत्यूसमयी ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मुलाने ही माहिती सोशल मीडियावर दिली.


रामविलास पासवान जुलै ५, इ.स. १९४६ - हे भारतातील हिंदी भाषक राजकारणी आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे ते संस्थापक, अध्यक्ष आहेत. भारतातील बिहार राज्यातील एका दलित परिवारात जन्माला आलेले पासवान हे बी.ए. आणि एल.एल.बी.पर्यत शिक्षित आहेत. पोलीस सेवेत मिळालेल्या नोकरीत रुजू न होता त्यांनी राजकीय प्रवास सुरु केला आणि सर्वप्रथम इ.स. १९६९ साली बिहार विधान परिषदेवर निवडून आले.

No comments:

Post a Comment